सस्वर मानस गायन स्पर्धेतून आत्मिक आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:09 PM2018-01-15T22:09:06+5:302018-01-15T22:09:28+5:30
सस्वर मान गायन स्पर्धेतून जीवनात आत्मिक आनंद प्राप्त झाल्याची अनुभूती मानसाला मिळते.
आॅनलाईन लोकमत
ककोडी : सस्वर मान गायन स्पर्धेतून जीवनात आत्मिक आनंद प्राप्त झाल्याची अनुभूती मानसाला मिळते. माणसाला आत्मिक आनंद मिळावा व जीवनात नवीन चेतना निर्माण व्हावी, याकरिता असे धार्मिक कार्यक्रम गरजेचे आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
केशोरी येथील हनुमान मंदिरच्या पटांगणावर तीन दिवसीय सस्वर मानस गायन स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी त्यांच्यासोबत तहसीलदार विजय बारुडे, ठाणेदार नागेश भास्कर, वनपरिक्षेत्राधिकारी काशिकर, कुलदीप लांजेवार, डॉ.आर.एस. काळे, सरपंच रियाज खान, मनेंद्र मोहबंशी, नरेंद्र सांडिल्य, भुवन घाटा, झामसिंग दुधकावरा उपस्थित होते. बजरंग मानस मंच ककोडीचे झामसिंग दुधकावरा यांनी डॉ. अभिमन्यू काळे यांचे शाल, श्रीफळ देवून स्वागत केले.
दुष्काळ सदृश्यस्थिती असून सुद्धा असे कार्यक्रम करुन ककोडी गावातील जनतेचे कौतूक केले पाहिजे, असे सांगून ते पुढे म्हणाले, देवरी तालुक्यात २०१७ मध्ये पाऊस कमी असल्यामुळे पिकांची परिस्थिती पाहून मदत करण्यात येईल. २०१७ मध्ये ६८ गावांना मदत जाहीर झाली आहे. ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कृषी पीक विमा फार्म ज्यांनी तांत्रिक अडचणीमुळे भरु शकले नाही त्यांचे फार्मपण ग्राह्य धरले जातील. रोजगार हमी (मनरेगा) १०० दिवस, १५० दिवस काम देण्यात यावे, यासाठी त्यात काही नियमांत बदल करायचे आहे. ते करुन परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांनी गावातील लोकांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांनी तीन दिवसीय गायन स्पर्धेबद्दल आयोजक सदस्यांसोबत चर्चा करुन परिसरातील प्रत्येक गोष्ट जाणून घेतली.