कोरोना लसीकरण जनजागृती काव्यगायन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:45+5:302021-05-25T04:32:45+5:30
सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने संदीप तिडके व किशोर डोंगरवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासंदर्भातील गैरसमज ...
सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने संदीप तिडके व किशोर डोंगरवार यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात कोरोना लसीकरणासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी ‘लसीकरण जनजागृती काव्य गायन स्पर्धा’ आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील १९ शिक्षक बंधू - भगिनींनी सहभाग घेतला आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत. लसीकरणासंदर्भात सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जनजागृतीपर व्हिडिओ मागवून युट्युबवर अपलोड केले आहेत. या स्पर्धेत मनोज गेडाम, जे. एम. टेंभरे, सुधीर खोब्रागडे, मनोज मेश्राम, उमेश रहांगडाले, देवेंद्र नाकाडे, लक्ष्मण आंधळे, नामदेव पटणे, अस्मिता पंचभाई, सुनंदा किरसान, किरण कावळे, संगीता रामटेके, भारती तिडके, यज्ञराज रामटेके, दीक्षांत धारगावे, सुनील शिंगाडे, पुंडलिक हटवार, सुरेश बोंबार्डे, सत्यवान गजभिये यांनी सहभाग नोंदविला असून, स्पर्धकांची लिंक संघटनेतर्फे सर्वत्र पोहोचविण्यात आली आहे.
आतापर्यंत ३२ हजार लोकांनी व्हिडिओ बघितले आहेत. स्पर्धेला ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, लसीकरणासंदर्भातील गैरसमज हळूहळू दूर होत आहे. १५ मेपासून स्पर्धेला सुरुवात झाली असून, २५ मेपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ज्या स्पर्धकाच्या काव्य गायनास जास्तीत जास्त लाईक्स मिळतील, अशा निवडक स्पर्धकांची निवड करून त्यांचा संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. शिक्षक समितीतर्फे आयोजित कोरोना लसीकरण जनजागृतीपर काव्य गायन स्पर्धेचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
स्पर्धेसाठी जिल्हा नेते मनोज दीक्षित, जिल्हा मार्गदर्शक एल. यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच. चौधरी, संदीप तिडके, विनोद बडोले, पी. आर. पारधी, वाय. पी. लांजेवार, मुकेश रहांगडाले, कैलास हांडगे, एन. बी. बिसेन, प्रदीप रंगारी, सुरेश कश्यप, उमेश रहांगडाले, केसाळे, टी. आर. लिल्हारे, गौतम बांते, सुनील बावनकर, मिथुन चव्हाण, विशाल कच्छवाय, बेनिराम भानारकर, दिलीप लोदी, शरद पटले, दिनेश उके, दीपक कापसे, जी. एम. बैस, बाळू वालोदे, रोशन मस्करे, अनुप नागपुरे, संजय बोपचे, माधव टेंभरे, रामेश्वर उके यांच्यासह समितीचे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.