शहरात जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:01+5:30

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील.

Spontaneous response to public curfew in the city | शहरात जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद

शहरात जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ पर्यंत जनता कर्फ्यू : शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षितता बाळगण्यासाठी नगरातील स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटन, अधिकारी-कर्मचारी व अनेक सेवाभावी नागरीकांनी नगर परिषदेकडे जनता कर्फ्यू लावण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. यावर नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी तातडीने निर्णय घेऊन सर्वानुमते १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान ५ दिवस जनता कर्फ्यु लावण्याची घोषणा केली. त्यानुसार, शहरात शुक्रवारी (दि.१८) सकाळपासून शहरातील सर्व दुकानदारांनी स्वत:ची दुकाने बंद ठेवीत जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद दिला.
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील. फळ, भाजी, किराणा दुकाने ३ ते ६ वाजतापर्यंत सुरू राहतील. दुध विक्रेत्यांनी सकाळी ९ वाजतापर्यंतच दुध विकावयाचे आहे.
जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याने पोलीस ठाणे, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना सहकायार्साठी निवेदन देण्यात आले आहे. नगराध्यक्ष बारेवार यांनी शहरवासीयांना कोरोनाच्या नियमानुसार सुरक्षित राहुन आपली जबाबदारी पार पाडण्यास कळविले आहे.
शहरात सॅनिटायझर फवारणी जनता कर्फ्यू लावण्यापूर्वीच करण्यात आली. शहरातील सतर्कतेचा फायदा म्हणजे जिल्ह्यात सगळीकडे कोरोनाचे रुग्णात वाढत आहे. पण शहरात आता रुग्ण आढळताच पुन्हा जनता व नगराध्यक्ष सतर्क होऊन तातडीचे उपाय करीत आहेत.

सडक-अर्जुनी येथे रविवारपासून जनता कर्फ्यू
शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नगर पंचायत, व्यापारी व शहरवासीयांच्या संयुक्त बैठकीत शहरात रविवारपासून (दि.२०) गुरूवारपर्यंत (दि.२४) म्हणजेच ५ दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आजची गरज लक्षात घेता नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, विविध सेवाभावी संस्था आणि काही गावकऱ्यांच्या विनंतीवरून एक सभा घेवून काही अटी-शर्ती ठरवून हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. यांतर्गत फक्त दवाखाने व मेडीकल स्टोर्स सुरू राहतील. तसेच डेली निड्स व दुग्ध विक्रेत्यांना सकाळी ९ वाजतापर्यंत दुकान सुरु ठेवता येईल. किराणा, भाजीपाला, फळे व कृषी केंद्रांना सकाळी ९ ते १ वाजतापर्यंत व्यवसाय सुरु ठेवता येणार आहे.
कुऱ्हाडीतही ३ दिवस बंद
तालुक्यातील कुऱ्हांडी येथे १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ३ दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारी पहिल्या दिवशी गावात बंदला स्वयस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. तसेच बंददरम्यान गाव सॉनीटाईज करण्यात आले. येथील दुकानदारांनी जनता कर्फ्यूला प्रतीसाद देत स्वत:ची दुकाने बंद ठेवली. बंदसाठी कुऱ्हाडी येथील सरपंच अल्का पारधी, उपसरपंच आनंद कटरे, ग्राम विकास अधिकारी एस.सी. रहांगङाले, सदस्य नितीन धमगाये, रविंद्र लांजेवार, पोलिस पाटील हेमराज सोनवाने, मोहन मरसकोल्हे, लिपीक छगनलाल अग्रेल, अमोल पडोळे, मंगेश रहांगडाले सहकार्य करीत आहेत.

Web Title: Spontaneous response to public curfew in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.