तालुक्यात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:12+5:302021-08-17T04:34:12+5:30
उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष भाऊराव कठाणे होते. प्रमुख पाहुणे ...
उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष भाऊराव कठाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समिती सभापती चिंतामण रहांगडाले, जनता शिक्षक महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मण आंधळे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर, तालुका कृषी अधिकारी पी. पी. मुंडे, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक शिल्पा येडे, आदमने, मंडळ कृषी अधिकारी वाय. बी. बावनकर, पी. पी. खंडाईत, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनवणे, अरविंद उपवंशी, कृषी पर्यवेक्षक रजनी रामटेके, जी. आर. फटिंग, कृषी सहायक रूपेश रिनाईत, विशाल साटकर, नरेश रहांगडाले, लता रहांगडाले, एल. पी. रिनाईत, महेंद्र शिरसाट, सचिन लांडे, छगन गवई, लक्ष्मी रहांगडाले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी, महोत्सवात खरेदीदारांची संख्या अजूनही वाढविण्याचा प्रयत्न संबंधित विभागाने करावा. जेणेकरून जास्तीत-जास्त लोकांना या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती मिळेल. त्याकरिता आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या इतरही योजनांचा प्रचार-प्रसिद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावी व प्रत्येक खेडेगावात विभागाची योजना राबवावी, असे सांगितले. कठाणे यांनी, रानभाज्यांमध्ये विविध औषधी गुण असल्याचे सांगितले व शासनाने अशाप्रकारचे महोत्सव दरवर्षी मोठ्या संख्येने राबवावे, जेणेकरून याचा फायदा ग्रामीण शेतकऱ्यांना होईल, असे म्हटले. संचालन आत्माचे उपवंशी यांनी केले. आभार कृषी पर्यवेक्षक जी. आर. फटिंग यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी विभाग व माविम कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी, महिला मंडळांनी सहकार्य केले.
-------------------------------
४० प्रकारच्या भाज्यांचे स्टॉल
या महोत्सवात ४० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. लोकांमध्ये रानभाज्यांविषयी जनजागृती करणे व रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व औषधी गुणधर्म त्यांना माहीत व्हावेत, जेणेकरून दैनंदिन आहारात रानभाज्यांच्या समावेश होईल, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करून प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा कृषी अधिकारी यांच्यावतीने छापलेल्या रानभाज्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.