संत सावता माळी रयत बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:29+5:302021-06-27T04:19:29+5:30
गोंदिया : कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.२५) ग्राम कारंजा येथील पोलीस वसाहतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने संत सावता माळी ...
गोंदिया : कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.२५) ग्राम कारंजा येथील पोलीस वसाहतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने संत सावता माळी रयत बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला उत्पादित भाजीपाला, फळे, प्रक्रिया उत्पादने ग्राहकांना विक्री करण्यास ठेवली होती. ग्राहकांनी या मालाची खरेदी करून बाजारास प्रचंड प्रतिसाद दिला.
बाजाराला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, कृषी उपसंचालक विष्णू साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी भीमाशंकर पाटील, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी भेट देऊन उत्पादक शेतकरी व ग्राहकांशी संवाद साधला. उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार शेतमालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले. पोलीस वसाहतीत शेतकऱ्यांना थेट विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि पोलीस निरीक्षक राजू मेढे यांचे विशेष सहकार्य कृषी विभागाला लाभले आहे. हा शेतकरी बाजार यापुढेही नियमित स्वरूपात भरवला जाणार असून त्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत अधिकारी-कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.