पानझडीने वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल

By admin | Published: February 24, 2016 01:52 AM2016-02-24T01:52:00+5:302016-02-24T01:52:00+5:30

आपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात.

Springsteen celebrates the arrival of Spring | पानझडीने वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल

पानझडीने वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल

Next

नव्या आकांक्षांचे डोहाळे : अन्य वृक्षांना नव्या साजाची प्रतीक्षा
नितेश किरणापुरे लवारी
आपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात. त्याचप्रमाणे वृक्षात काही बदल घडून येतात. ते म्हणजे पानझड त्यापैकी एक आहे.
वसंत ऋतुची चाहुल लागताच पानझड किंवा त्याला पानगळ म्हणतात, त्याची सुरवात होते. आता सगळीकडे पानगळ सुरू झाली आहे. मरगळ असलेली माणसे, रखरखतं ऊन, जगण्याची उमेद संपलेला ऋतु, उदासीन रडगाने गात असतातच राणावणात वाटेवरून जगण्याचं संदेश देवून येणारी काही वृक्ष. त्यात पळस व सावरी सारखे वृक्ष आयुष्याचे केशरी रंग मुक्त हस्ताने उधळत साऱ्या सृष्टीला जगण्याचे बळ देत आहे.
पळसाप्रमाणेच वसंत ऋतुत फुलणाऱ्या सावरीच्या वृक्षाचे जीवन काटेरी असले तरी जगण्याच्या नवा छंद हा इतरांना देत असतो. तसेच वसंत म्हटला की, कोकीळीचे स्वर पंचम निपान झडलेल्या शुल्क फांद्याच्या वाट्यावर डोलणारा मंद स्वर, ही नादसृष्टी वसंताचे वैशिष्टपूर्ण संगीत होय.
पुन्हा नव्या आकांक्षाचे त्यांना डोहाळे लागले आहेत. माणसाच्या मनात नी डोळ्यात सध्या ओका बोका परिसर आहे. मात्र सजीव सृष्टीना वसंताकडून नव्या जीवनाची आशा आहे. वसंतच त्यांना नव्या आयुष्याचा कर्णधार आहे. पानझळीमुळे इतर वृक्षांना नव्या साजाची प्रतिक्षा असतानाच पळस, सावरी आणि आम्रवृक्ष अभावरील विलोभनीय साजामुळे इतरांना चिडवतोय असे नव्हे तर तुम्हाला सुद्धा नवे बहर येईल.
तुम्ही सुद्धा या धरतीला नववधुसारखे सजवणार हेच सुचतो आपण सर्वजणच निष्पर्ण झालो तर या धरतीच्या सौंदर्यात कमीपणा येईल म्हणून वसंतात आम्हाला फुलवत ठेवले असेल असे या वृक्षांना वाटत असावे. पावसाळ्यानंतर सर्व वृष्टी नववधूसारखी सजलेली असते. ऐन उमेदीत असल्यागत वृष्टी हिरवा शालू पांघरल्यातगत दिसते. हिवाळ्यापर्यंत निसर्गसौंदर्य बहरून असतो. वसंत ऋतूच्या आगमन झाल्यानंतर त्यात हळूवार बदल दिसून येतो. मात्र, हा बदल चार महिन्याचा असतो. परत येणाऱ्या पावसाळ्यानंतर सृष्टी नविन पालविसह नव्या दमाने उभी राहते.

Web Title: Springsteen celebrates the arrival of Spring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.