बाघ नदीला उधाण :
By admin | Published: August 7, 2016 12:57 AM2016-08-07T00:57:41+5:302016-08-07T00:57:41+5:30
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या बाघ नदीचे विस्तीर्ण पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे.
Next
बाघ नदीला उधाण : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या बाघ नदीचे विस्तीर्ण पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे. दरवर्षी नदीचे पात्र भरले की दोन्ही राज्यांना जोडणारा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक अनेक तास खोळंबून राहात होती. मात्र यावर्षी या नदीवरील नवीन पूल सुरू झाल्यामुळे नदीला पूर आलेला असतानाही वाहतूक सुरूळीत सुरू आहे. विशेष म्हणजे छायाचित्रात या नदीवरील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली बुडालेला दिसत आहे. मध्यप्रदेश शासनाच्या ताब्यात असलेला हा पूल आता सुरू झाल्यामुळे गोंदिया ते बालाघाट (मध्यप्रदेश) या जिल्ह्यांमधील वाहतूक सुरळीत सुरू आहे.