एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार थकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:17+5:302021-08-17T04:34:17+5:30

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मात्र एकामागे एक ...

ST employees' July salary is exhausted | एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार थकला

एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार थकला

Next

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मात्र एकामागे एक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामु‌ळे कामातील अडचणी वाढत चालल्या असतानाच आता जुलै महिन्याचा पगार थकल्याने त्यांना आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू असून, लॉकडाऊनमुळे महामंडळ चांगलेच तोट्यात आले आहे. परिणामी त्याचे पडसाद कर्मचाऱ्यांच्या पगारावरही दिसून येत आहेत. आता दुसऱ्या लाटेमुळे एसटी पुन्हा बंद होती व महामंडळाला पुन्हा फटका बसला. परिणामी त्याचे परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पुन्हा दिसत आहेत. आता सणासुदीला सुरुवात झाली असूनही एसटी कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार थकला आहे.

--------------------------------

आकडे काय सांगतात?

आगार कर्मचारी

गोंदिया ३११

तिरोडा १६९

--------------------------

उत्पन्न कमी अन्‌ खर्च जास्त

गोंदिया आगार जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे आगार असून, येथील कर्मचारी संख्याही जास्त आहे. आगारात ३११ कर्मचारी कार्यरत असून, आगाराला सुमारे १.५० कोटी रुपये मासिक खर्च येतो. मात्र, कोरोनामुळे अद्याप प्रवासी प्रतिसाद नसल्याने आगाराचे उत्पन्न जेमतेमच आहे.

- तिरोडा आगार दुसरे आगार असून, आगारात १६९ कर्मचारी कार्यरत आहेत. आगाराला दरमहा सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पन्न नाहीच. परिणामी महामंडळाला फटका बसत आहे. यामुळेच पगारावर त्याचा परिणाम जाणवतो.

---------------------------

उसनवारी तरी किती करायची ?

- कोरोनामुळे आगाराच्या उत्पन्नावरही परिणाम झाला असून, महामंडळाची अडचण वाढली आहे. परिणामी आमचे पगारही अडले आहेत. पगार न मिळाल्याने संपूर्ण बजेट बिघडून जात असून, वारंवार कुणाकडे उसनवारी करता येत नाही. पगार नसल्याने अडचण होते.

- सईद शेख, चालक

------------------

मागील वर्षी कोरोनाचा कहर सुरू झाला व तेव्हापासून पगारामध्ये अनियमितता होत आहे. आता जुलै महिन्याचा पगार अडला आहे. आता सणासुदीला सुरुवात झाली असून, पगार हाती नसल्याने सर्वच काही अडून जाते. सगळे बजेट बिघडून जात असल्याने अडचण होते.

- अशोक चौरसिया, वाहक

--------------------------------

मागील वर्षी कोरोनापासून महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचे परिमाण सर्वच बाबींवर पडतात. आता दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा महामंड‌ळ अडचणीत आले असून, खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने पगारही अडले असावेत. जुलै महिन्याचा पगार अडला आहे.

- संजना पटले, आगार प्रमुख, गोंदिया.

दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया

४) नियंत्रकाचा कोट

Web Title: ST employees' July salary is exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.