एस.टी. महामंडळाच्या कागदावर वाहतूक पोलिसांचे चालान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:03+5:302021-09-18T04:32:03+5:30
याबाबत एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी विचारणा केली असता या मूल्य एस.टी.वर्धित कागदाचा एसटीशिवाय ...
याबाबत एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी विचारणा केली असता या मूल्य एस.टी.वर्धित कागदाचा एसटीशिवाय कुणालाच वापर करता येत नसल्याचे सांगितले. मात्र, महामंडळाच्या तिकिटासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाचा दुरुपयोग होत असल्याने याची चौकशी करण्याची मागणी जैन यांनी केली आहे. १३ सप्टेंबर २०२१ रोजी वाहतूक पोलीस केशोरीद्वारा वाहन क्र. एमएच १४ जीयू १२७० या वाहनाकडून २०० रुपयाचे चालान दिले; परंतु पॉस मशीनद्वारा चालान देताना मशीनमधून मिळालेली पावती ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची असल्याने व त्यावर प्रिंट केलेला मजकूर हा वाहतूक पोलिसांचा असल्याने एस.टी. महामंडळाचा मूल्यवर्धित कागदचा रोल वाहतूक पोलिसांकडे कसा? याबाबत शंका निर्माण झाली आहे. नरेश जैन यांनी एस.टी.महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. यावर एस.टी. विभाग काय कारवाई करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.