रेतीसाठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:31 AM2021-04-09T04:31:24+5:302021-04-09T04:31:24+5:30
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत ...
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू
सडक-अर्जुनी : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे होत असलेले दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता
गोंदिया : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भर घालण्यात आली असली तरी हे साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी होत आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
महामार्गावरील अंडरपास मार्ग प्रलंबित
सडक अर्जुनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वरील डोंगरगाव डेपो, सशीकरण पहाडी व डुग्गीपार परिसरात विविध जातीच्या वन्यजीव प्राण्यांना रस्ते अपघातात नेहमीच जीव गमवावा लागतो. याकरिता अंडरपास मार्गाची मागणी केली जात आहे. हा रस्ता प्रलंबित असल्याने वन्यजीवांना नाहक जीव गमवावा लागत आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंध पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत
गोरेगाव : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारांसाठी भटकंती करावी लागत आहे.
उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणांची समस्या वाढली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे धोका होवू शकतो.
मुडीकोटा-येडमाकोट रस्त्याची दयनीय अवस्था
तिरोडा : मुंडीकोटा तिरोडा तालुक्यातील येडमाकोट ते केसलवाडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे . केसलवाडावरून अनेक नागरिक तसेच महाविद्यालय विद्यार्थी येडमाकोट रस्त्यांनी येऊन सरळ तुमसर ते तिरोडा एसटी बसने जात असतात. येडमाकोट फाट्याजवळ नवीन प्रवासी निवारा तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी नागरिक विद्यार्थी एकत्र येऊन थांबत असतात.येडमाकोट ते केसलवाडा हा रस्ता जीर्ण झाला असून गिट्टी व मुरूम उखडलेला आहे. परिणामी हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे.