धान खरेदी त्वरित सुरू करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:30 AM2021-05-26T04:30:12+5:302021-05-26T04:30:12+5:30

सालेकसा : भारतीय जनता पक्ष सालेकसा मंडळाच्या वतीने जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदीसाठी केंद्रांवर त्वरित धान खरेदी करण्यात ...

Start buying grain now () | धान खरेदी त्वरित सुरू करा ()

धान खरेदी त्वरित सुरू करा ()

Next

सालेकसा : भारतीय जनता पक्ष सालेकसा मंडळाच्या वतीने जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदीसाठी केंद्रांवर त्वरित धान खरेदी करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. तसेच बुधवारपर्यंत (दि.२६) मागण्यांची पूर्तता न झाल्यास गुरुवारपासून (दि.२७) आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निवेदनात, रबी धान खरेदी केंद्रावर त्वरित धान खरेदी करण्यात यावे, शेतकऱ्यांना ७०० रु. बोनस देण्यात यावा, ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी व धडक सिंचन विहिरीचे बिल त्वरित देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना महामंत्री यादन नागपुरे, भाजयुमो अध्यक्ष आदित्य शर्मा, नगरपंचायत सभापती उमेदलाल जैतवार, बबलू शिवनकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Start buying grain now ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.