गोदामे बांधकामाची प्रक्रिया त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:11 PM2019-07-17T22:11:16+5:302019-07-17T22:11:31+5:30

गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप व रब्बी हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते.मात्र धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था नसल्याने धान ताडपत्र्या झाकून उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता.

Start the construction of the godown construction immediately | गोदामे बांधकामाची प्रक्रिया त्वरित सुरू करा

गोदामे बांधकामाची प्रक्रिया त्वरित सुरू करा

Next
ठळक मुद्देपरिणय फुके : लोकमतच्या वृत्ताची दखल, धानाची नासाडी होऊ देवू नका, समस्या लागणार मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप व रब्बी हंगामात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते.मात्र धानाची साठवणूक करण्यासाठी गोदामांची व्यवस्था नसल्याने धान ताडपत्र्या झाकून उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लोकमतने सुध्दा हा मुद्दा लावून धरला होता. याची राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी गांर्भियाने दखल घेत धानाची योग्य साठवणूक करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात १९ गोदामे बांधकामाची प्रक्रिया त्वरीत सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सध्या स्थितीत आदिवासी क्षेत्रात दुर्गम, जंगल व्यात तसेच काही जिल्ह्यामध्ये एकुण खरेदीच्या तुुलनेत धान्य साठवणूक क्षमता अपुरी असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेला धान उघड्यावर ताडपत्र्या झाकून ठेवावा लागतो. त्यामुळे धानाची चोरी व मोठ्या प्रमाणात नासाडी होते. त्यामुळे ही समस्या मार्गी लावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत धानाची खरेदी करून त्याची तंत्रशुद्ध पद्धतीने साठवणूक करण्यासाठी गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातील प्रस्तावित १९ गोदामे बांधकामांसाठी स्थानिक पातळीवर येणाºया अडचणी सोडवण्यासाठी डॉ. परिणय फुके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत आदिवासी विकास महामंडळ आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना गोदामे बांधकामाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.विविध कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचिवण्यासाठी विभागाने व आदिवासी महामंडळाने आवश्यक ते प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले.
विशेष म्हणजे लोकमतने उघड्यावरील धानाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. कोट्यवधी रुपयांचे आदिवासी विकास महामंडळाचे धान उघड्यावरच या मथळाखाली वृत्त प्रकाशित केले होते.त्याची गांर्भियाने दखल घेत फुके यांनी गोदामांची समस्या दूर करण्याचे निर्देश दिले. यामुळे बºयाच वर्षांपासूनची समस्या फुके यांच्यामुळे मार्गी लागली आहे.

Web Title: Start the construction of the godown construction immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.