गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:06+5:302021-02-23T04:45:06+5:30
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. गोंदियापासून तालुक्याचे अंतर १०० किलोमीटर आहे. जिल्ह्याच्या ...
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. गोंदियापासून तालुक्याचे अंतर १०० किलोमीटर आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जनतेला अनेक कामानिमित्त जावे लागते. वेळेवर बस सेवासुद्धा उपलब्ध नाही. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे रेल्वे सेवा पूर्णत: बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेला गोंदियाला जाण्या-येण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो. पर्यायाने बस सेवेचा खर्चसुद्धा जास्त येतो. शासकीय कार्यालयातील अनेक कामे वेळेवर होत नाही. पर्यायाने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे सेवा ही गोरगरिबांसाठी अल्प खर्चात परवडणारी सेवा आहे. त्यामुळे गाेरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करुन रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे. गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर गाडी सुरू झाल्यास अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील जनतेला फारच सोयीस्कर होईल. सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठीसुद्धा ही गाडी सुरू झाल्यास सोयीचे होईल. त्यामुळे ही गाडी सुरू करण्याची मागणी दिलीप सोनवाने व परिसरातील प्रवाशांनी केली आहे.