सडक अर्जुनी येथे तत्काळ कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:50+5:302021-04-13T04:27:50+5:30
आरोग्य यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असून शासकीय आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत ...
आरोग्य यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असून शासकीय आरोग्य केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना मृत्यूच्या आहारी जावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव परिसरात खूप वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. बाधितांना प्रोटीनयुक्त आहार व औषधींची गरज असताना आवश्यक सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधार होण्याऐवजी कोरोना स्टेजमध्ये वाढ होत असून मृत्यूचे प्रमाण अधिक वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सोयीसुविधायुक्त नसल्याने खाजगी दवाखान्याचा खर्च सर्वसामान्यांना झेपणारा नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या तीन दिवसात कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. लांजेवार यांनी केली आहे.