लिफ्ट इरीगेशन सुरू करा
By admin | Published: February 13, 2017 12:25 AM2017-02-13T00:25:09+5:302017-02-13T00:25:09+5:30
भविष्यात शिरपूरबांध धरणातील पाणी चिचगड परिसरात पडले तर संपूर्ण तालुका हा सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल.
सहषराम कोरोटे : टोयागोंदी येथे क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धा
देवरी : भविष्यात शिरपूरबांध धरणातील पाणी चिचगड परिसरात पडले तर संपूर्ण तालुका हा सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल. त्यासाठी लिफ्ट एरीकेशन त्वरित सुरू करण्यात यावे, असी मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले.
ते देवरी तालुक्यातील आदिवासी दुर्गम गाव टोयागोंदी येथे क्लोज प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, टोयागोंदी गावातील अनेक शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती सिरपूर (बांध) धरणात गेली. परंतु या धरणातील एक बुंद पाणी देवरी तालुक्यातील एकही शेतकऱ्यांना मिळत नाही. या धरणातील पाण्याचा उपयोग फक्त मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना होत आहे. या भागातील शेतकऱ्यांची जमीन ही सुपीक आणि त्यांना या जमिनीतून रबी व खरीप हंगामातील पीक घेणे सोईस्कर असतानाही या उलट या धरणातील पाण्यापासून देवरी तालुका येथील शेतकरी वंचित झाला आहे.
या गंभीर मुद्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचार करुन आणि पुढाकार घेवून या धरणावर लिफ्ट एरीकेशन त्वरित सुरू करण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, आज देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेवून बेरोजगाराचे जीवन जगत आहेत. त्यांच्या हातांना कोणतेही काम नाही. ते कामाच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. तरी या गंभीर बाबीकडे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. यासाठी आता शासनाने स्वत: पुढाकार घेवून देवरी तालुक्यात एक मोठे उद्योग त्वरित सुरू करुन येथील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेही कोरोटे म्हणाले.
उद्घाटन सहषराम कोरोटे यांच्या हस्ते, नकटीचे सरपंच पुस्तकला मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
याप्रसंगी मंचावर उपसरपंच तेजराम गावळे, ग्रामपंचायत सदस्य कांता लांज़ेवार, निळा मडावी, भोजराज नेताम, पोलीस पाटील प्रतिमा राऊत, जि.प. शाळेचे राऊत, अंगणवाडी सेविका हेमलता लांजेवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव आचले. भर्रेगावचे डॉ. पाटील, काँग्रेस कार्यकर्ते बळीराम कोटवार, माजी सरपंच धनपत भोयर, भिवाराम इंगोले, शामलाल काटेंगे, ओमप्रकाश राऊत, सुरेंद्र राऊत, सदाराम नंदेश्वर, विजय राऊत, संध्या वालदे, दिनेश राऊत, अनिल राऊत व रोजगार सेवक धनराज बहेकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक व संचालन नामदेव आचले यांनी केले. आभार बंटी गावळे यांनी मानले. कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.