दुपारच्या वेळेत लोकल गाडी सुरु करा

By admin | Published: April 6, 2016 02:00 AM2016-04-06T02:00:09+5:302016-04-06T02:00:09+5:30

सालेकसा-आमगाव तालुका परिसरातील प्रवाशांना दुपारच्या वेळेत नागपूरकडे रेल्वेने प्रवास करायचा असेल तर कोणतीही लोकल गाडीची सुविधा नाही आहे.

Start a local car at noon time | दुपारच्या वेळेत लोकल गाडी सुरु करा

दुपारच्या वेळेत लोकल गाडी सुरु करा

Next

सालेकसा : सालेकसा-आमगाव तालुका परिसरातील प्रवाशांना दुपारच्या वेळेत नागपूरकडे रेल्वेने प्रवास करायचा असेल तर कोणतीही लोकल गाडीची सुविधा नाही आहे. तसेच रायपूरकडे जाण्यासाठी कोणतीच लोकल गाडीची सोय नाही. त्यामुळे सालेकसा प्रवाशांना रेल्वे सेवेचा कोणताच विशेष लाभ मिळत नाही.
सालेकसावरुन नगापूरकडे जाण्यासाठी सकाळी ६ व ९ वाजता, त्यानंतर सरळ ५ वाजता सायंकाळी आणि रात्री ९ वाजता लोकल गाडीची सोय आहे. सकाळी ९ ते ५ वाजताच्या मधात एकूण आठ तासांच्या कालावधीत कोणतीच रेल्वे सेवा उपलब्ध नाही. तसेच सालेकसा येथे हावडा-कुर्ला आणि छत्तीसगड एक्स्प्रेस अशा दोनच एक्स्प्रेस गाड्या थांबतात. हावडा-कुर्ला सकाळी ८.३० वाजता आणि छत्तीसगड एक्स्प्रेस सायंकाळी ६ वाजता असून यांचासुद्धा लाभ दुपारी मिळत नाही.
त्याचप्रमाणे नागपूरवरुन येण्यासाठी किंवा रायपूरकडे जाण्यासाठी सकाळी ६ वाजता आणि ११ वाजतानंतर सरळ सायंकाळी ६ च्या नंतर लोकल गाडी असून मधात कोणतीच रेल्वे गाडीची सोय नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेत अप लाईन आणि डाऊन लाईन दोन्ही मार्गावर लोकल गाडीची सोय करण्यात यावी, अशी मागणी सालेकसा-आमगाव तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: Start a local car at noon time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.