खजरी येथे धान खरेदी केंद्र सुरु
By admin | Published: November 30, 2015 01:38 AM2015-11-30T01:38:17+5:302015-11-30T01:38:17+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक-२ उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधद्वारे आदिवासी ...
पांढरी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक-२ उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधद्वारे आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था खजरी येथे माजी जि.प. सदस्य बाबुराव कोरे यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष देवानंद कोजबे, उपसरपंच उमराव मांढरे, संचालक प्रेमलाल राऊत, वासुदेव राऊत, ईश्वर खोटेले, लक्ष्मण लंजे, गुलाब राऊत, केवळराम गहाणे, उसन लटये, रघुनाथ येल्ले, बाबुराव हुकरे, भोजराज राऊत, राजाराम झिंगरे, दिलीप गायकवाड, उसन वरखडे उपस्थित होते.
आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम २०१५-१६ धान आणि कलम अ, दर १४५० प्रति क्विंटल, धान साधारण दर १४१० प्रति क्विंटल आहे. कचरा-माती २ टक्के, किडलेला रंगहिन तुकडा ५ टक्के, अपरिपक्क-सुरकलेला ३ टक्के, इतर भेसळ ६ टक्के, ओलावा ७ टक्के धान खरेदी करावयाच्या विनिदेश आहेत. धान विक्री करिता सातबाराची मूळ प्रत व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्पष्ट असलेली छायाप्रत असणे बंधनकारक आहेत.
शेतकरी वर्गानी आपले धान आधारभूत केंद्रातच विक्री करावे कोणत्याही धान भुसारी यांना बळी पडू नये असे आवाहन डॉ. बाबुराव कोरे यांनी केले. यावेळी खजरी, डोंगरगाव, कोहळीटोला, चिखली येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यशस्वितेकरिता सचिव जितेंद्र कुरसुंगे, केंद्रप्रमुख विशाल राऊत यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)