शालार्थ पोर्टल सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:06 AM2018-02-23T00:06:37+5:302018-02-23T00:06:56+5:30

मागील १० जानेवारीपासून शालार्थ पोर्टल बंद असल्यामुळे आॅनलाईन वेतन स्विकारण्यात येत नसून आॅफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येते. त्यामुळे दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळणे दूरच परंतु १० तारखेपर्यंत वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा केली जात नाही.

Start the portal | शालार्थ पोर्टल सुरु करा

शालार्थ पोर्टल सुरु करा

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप शिक्षक सेलची मागणी : उपशिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : मागील १० जानेवारीपासून शालार्थ पोर्टल बंद असल्यामुळे आॅनलाईन वेतन स्विकारण्यात येत नसून आॅफलाईन पद्धतीने स्विकारण्यात येते. त्यामुळे दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळणे दूरच परंतु १० तारखेपर्यंत वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा केली जात नाही. त्यामुळे शालार्थ पोर्टल सुरू करण्यात यावे. अशी मागणी भारतीय जनता पक्ष शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली असून यासाठी उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने शासनस्तरावर आॅनलाईन वेतन स्विकारण्याकरीता शालार्थ पोर्टल सुरु केले होते. शालार्थ पोर्टलनुसार राज्यातील सर्व शिक्षकांच्या आयडी तयार करुन शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होते. त्यानुसार दर महिन्याच्या १ तारखेला वेतनाची रक्कम शिक्षकांना मिळत होती. परंतु १० जानेवारीपासून हे पोर्टल बंद पडले आहे. यामुळे शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशात विम्याचे हप्ते थकतात, कर्जाचे मासिक हप्ते वेळेवर न भरल्यामुळे शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांमध्ये शासनाच्या धोरणांना घेऊन आक्रोश आहे. यावर जिल्ह्यातील भाजप शिक्षक सेलच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी (दि.२०) माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांना निवेदन देऊन पोर्टल सुरू करावे अशी मागणी केली.
निवेदन देताना जिल्हा संयोजक लिलेश्वर बोरकर, सहसंयोजक दिनेश कोहळे, शहर संयोजक दुधराम राऊत, दत्ता लहाने, आर.जी.कटरे, सी.डी.बुद्धे उपस्थित होते.

Web Title: Start the portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.