सौंदड येथे क्वारंटाईन सेंटर सुरू करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:28 AM2021-04-18T04:28:22+5:302021-04-18T04:28:22+5:30
सडक-अर्जुनी : राज्यात व विशेषत: ग्रामीण भागात कोविड-१९ आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यासह सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड या गावात ...
सडक-अर्जुनी : राज्यात व विशेषत: ग्रामीण भागात कोविड-१९ आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यासह सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड या गावात कोरोनाचा उद्रेक वाढलेला आहे. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गावात वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोना आजाराला नियंत्रित करण्याकरिता सौंदड येथील जि. प. हायस्कूल, प्राथमिक शाळा आदी ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तयार करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री हर्ष मोदी यांनी सडक अर्जुनीचे खंडविकास अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी यांना केली आहे.
सौंदड गाव हे सडक अर्जुनी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर आहे. दरम्यान, येथे आरोग्य सुविधेच्या दृष्टीने येथील रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याने सौंदड गावातील शाळांमध्येच क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी हर्ष मोदी यांच्यासह भाजप युवा मोर्चा पदाधिकारी गौरेश बावनकर, हितेश मेश्राम, तुकाराम रामे, प्रशांत झिंगरे, किशोर डोंगरवार, राजेश कापगते, दिलेश सोनटक्के, पराग कापगते, विजय चौधरी, दीपक वंजारी, दिनेश शहारे, चरण शहारे, प्रशांत नगरकर, रमेश लांजेवार आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.