पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:51+5:302021-07-01T04:20:51+5:30
गोंदिया : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून रखडली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ...
गोंदिया : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून रखडली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचे आदेश २ मार्च २०१९ रोजी शासनाने काढले होते. पण, याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासनाने त्याची अद्याप दखल घेतली नाही. शासनाने २ मार्च २०१९ रोजी यासंदर्भात आदेश काढले. पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे एकही अंशकालीन कर्मचारी आतापर्यंत नोकरीवर लागला नाही. त्यामुळे अंशकालीन कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे २ मार्चच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून अंशकालीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी पालकमंत्री नवाब मलिक यांना दिलेल्या निवेदनातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्ही. एम. चौरे यांनी केली आहे.