रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 11:58 PM2019-01-05T23:58:00+5:302019-01-05T23:58:31+5:30
शहरातील प्रभाग क्र.१ मधील कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौक मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील प्रभाग क्र.१ मधील कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौक मार्गाची अंत्यत दुर्दशा झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
कुडवा नाका ते वसंत लिथो प्रेस चौकापर्यंत रस्त्या रुंदीकरण व डांबरीकरण व नाली बांधकामाला शासनाने २०१७ पासून मंजुरी दिली आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. परिणामी विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. तिरोडा तुमसर व गोंदिया ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा सर्वाधिक वापर होतो.
या मार्गावर शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची सुध्दा ये-जा सुरू असते. मात्र हा रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाºयांसाठी त्रासदायक ठरत आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्याने मागील काही दिवसांपासून या मार्गावर अपघातांच्या संख्येत सुध्दा वाढ झाली आहे.
शासनाने या मार्गाची दुरूस्ती व रुंदीकरणाला मंजुरी दिली असताना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये रोष व्याप्त आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याचे काम त्वरीत सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा राष्टÑवादी काँग्रेसने दिला आहे.