रायपूर-नागपूर-रायपूर प्रवासी गाडी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 09:49 PM2018-09-02T21:49:20+5:302018-09-02T21:49:46+5:30
इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : मंडळ रेल उपभोक्ता सलाकार समिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळ नागपूरच्या अध्यक्षा शोभना बंडोपाध्याय यांच्या अध्यक्षतेत सल्लागार समितीची सभा आयोजित केली होती. सभेत सल्लागार समितीचे सदस्य नानु मुदलीयार, नानकराम अनवानी, नटवरलाल गांधी, विकास बोथरा यांनी इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे. यावर मंडळ रेल प्रबंधक बंडोपाध्याय यांनी, कोणतीही नवीन रेल सेवा सुरु करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाची परवानगी लागते. यामध्ये आम्हाला क्षेत्राधिकार नाही परंतु प्रवाशांच्या सोयी संबंधी अन्य अडचणीबाबत योग्य सहकार्य व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसला आमगाव रेल्वे स्टेशन येथे थांबा मिळावा याकरिता रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव अग्रेषित करण्याबाबतचे आश्वासन दिले. गोंदिया ते रायपूर १७० कि.मी. आहे. म्हणून या सेक्शनमध्ये प्रवाशांना मासिक टिकिट मिळत नाही. तरी प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबत मागणी करण्यात आली. गोंदिया येथून शेगाव करिता प्रतिदिन जनशताब्दी एक्सप्रेस चालविणे, पुरी एलटीटी एक्स्प्रेसचा थांबा गोंदिया स्थानकावर देणे, पेसेंजर, लोकल रेल्वे गाड्या वेळेवर चालविणे, एक्स्प्रेस गाडीत आरक्षित चेअरकार कोच उपलब्ध करुन द्यावे, रायगड-नवी दिल्ली-रायगड गोंडवाना एक्स्प्रेसला कामठी येथे थांबा द्यावा तसेच आमगाव स्टेशनपासून १० कि.मी.वर जवरी गावात असलेली रेल्वे चौकी सध्या असलेल्या ठिकाणावरुन हलवून अंदाजे २०० मिटर वर असलेल्या ठाणा-सितेपार मेनरोड वर स्थापित करावी, बल्लारशा ते डोंगरगढ व्हाया गोंदिया पेसेंजर आणि रायपूर-गोंदिया-रायपूर करिता दुपारी ११ वाजतानंतर व सांयकाळी ४ वाजताच्या आधी पॅसेंजर गाडी सुरु करण्याची व आमगाव स्टेशनवर कोच डिस्पले सिस्टिम लावण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी समितीचे सदस्य नटवरलाल गांधी यांनी मागणी केली आहे.