१८ वर्षांवरील वर्गाचे लसीकरण सुरू करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:08+5:302021-05-28T04:22:08+5:30

बिरसी-फाटा : कोरोनाचा कहर बघता १८ वर्षांवरील वर्गाचे लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय युवा मोर्चाने केली असून ...

Start vaccination for class above 18 years () | १८ वर्षांवरील वर्गाचे लसीकरण सुरू करा ()

१८ वर्षांवरील वर्गाचे लसीकरण सुरू करा ()

Next

बिरसी-फाटा : कोरोनाचा कहर बघता १८ वर्षांवरील वर्गाचे लसीकरण सुरू करण्यात यावे अशी मागणी भारतीय युवा मोर्चाने केली असून यासाठी बुधवारी (दि. २६) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

विरोधी पक्षनेते फडणवीस बुधवारी जिल्ह्यात आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत त्यांना कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि तिसरी लाट लक्षात घेता युवा वर्गाचे लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने पूर्ण नियोजन करुन सरसकट युवकासोबत न्याय करण्याची गरज आहे. अशी मागणी भाजयुमोने केली आहे. यावर १८ वर्षांवरील युवा वर्गाला लसीकरण सुरु करण्याकरिता फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना भाजयुमोच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून याप्रसंगी महामंत्री हर्ष मोदी, गुड्डू चांदवानी, पारस पुरोहित, पलाश लालवानी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Start vaccination for class above 18 years ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.