बोगद्यात पाईप टाकण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:21 PM2018-12-09T21:21:44+5:302018-12-09T21:22:15+5:30

येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्यात १० ते १२ फुट साचून राहत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे.

Starting the pipe in the tunnel | बोगद्यात पाईप टाकण्यास सुरुवात

बोगद्यात पाईप टाकण्यास सुरुवात

Next
ठळक मुद्देरेल्वे विभागाने वचन पाळले : पाण्याची होणार विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्यात १० ते १२ फुट साचून राहत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करीत नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्याकडे तक्रार केली होती. बारेवार यांनी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुन त्या भुयारी बोगद्यातील पाण्याकडे रेल्वे विभागाचे लक्ष वेधले होते. त्याची अखेर दखल घेत रेल्वे विभागाने बोगद्याच्या बाजूला हलबीटोला ते हिरडामाली पर्यंत पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
हलबीटोला मार्गावरील रेल्वे भुयारी बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या मार्गावर पाणी साचून राहत असल्याने गावकºयांची अडचण होत होती. या समस्येवर नगराध्यक्ष बारेवार व काही समाजसेवकांनी रेल्वे विभागाशी संपर्क साधून गावकºयांची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली होती. याची दखल घेत रेल्वे विभागाच्या अधिकाºयांनी रेल्वे भुयारी बोगद्याची पाहणी करुन पाईप लाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, रेल्वे विभागाने आश्वासनाची पुर्तता केली असून पाईप लाईनच्या कामाला शनिवारी (दि.८) सुरुवात केली. ५५० मिटर लांब पाईप लाईन व १२ ते १५ चेंबरच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष बारेवार, विकास बारेवार, वामन वरवाडे, मोरेश्वर कांबळे, नगरसेविका चंद्ररेखा कांबळे, अनिल राऊत, अशोक गिऱ्हेपुंजे, बंडू बोरसरे, रेल्वेचे कंत्राटदार उपस्थित होते.

Web Title: Starting the pipe in the tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे