शाहीर बांते यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार
By admin | Published: March 9, 2017 12:33 AM2017-03-09T00:33:36+5:302017-03-09T00:33:36+5:30
शाहीरी, तमाशा या कलाक्षेत्रात सलग ६० वर्ष समाज प्रबोधन करणारे तिरोडा तालुक्याच्या सेलोटपार येथील प्रसिध्द शाहीर मधुकर बांते
गोंदिया : शाहीरी, तमाशा या कलाक्षेत्रात सलग ६० वर्ष समाज प्रबोधन करणारे तिरोडा तालुक्याच्या सेलोटपार येथील प्रसिध्द शाहीर मधुकर बांते यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मंत्रालय मुंबई कडून सन २०१६-१७ या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१ लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. ते आता ७९ वर्षाचे आहेत. ४ मार्च रोजी रविंद्र नाट्य मंडळ दादर मुंबई येथे यांना सांस्कृतिक तथा शिक्षण मंत्री विनोद तावडे परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, बृहन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खा. राहुल शेटगे यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यातील दंडार, तमाशा व तुमडीचा गाणा याला व्यापक प्रमाणात समाजात रूजवून लोकरंजनातून जनजागृती त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)