भारतीय विद्यार्थी संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:56+5:302021-06-27T04:19:56+5:30

या वेळी दिलेल्या निवेदनातून शाळा, महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क संबंधात शासनाला विचारणा, शाळा, महाविद्यालय बंद मग पूर्ण फी कशाची, ...

Statement of Indian Students Union to the Minister of Education | भारतीय विद्यार्थी संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

भारतीय विद्यार्थी संघटनेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

Next

या वेळी दिलेल्या निवेदनातून शाळा, महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क संबंधात शासनाला विचारणा, शाळा, महाविद्यालय बंद मग पूर्ण फी कशाची, ऑनलाइन फी व्यतिरिक्त इतर कोणतीही फी घेऊ नये, ऑनलाइन फी अवाजवी लावणे योग्य नाही, कोरोना महामारीमुळे जनतेचा आर्थिक स्तर खालावलेला आहे. ऑनलाइन फी मध्ये सवलत देण्यात यावी, पालक- शिक्षक समितीची निवड निवडणुकीव्दारे करण्यात यावी. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या वेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. निवेदन देण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शांततेत रॅली काढून तहसील कार्यालयात सभा घेण्यात आली. या वेळी विदर्भ अध्यक्ष विद्या जनार्दन शिंगाडे, जिल्हा अध्यक्ष निखिल बनसोड, राजीव फुंडे, कार्याध्यक्ष पिंकेश शेंडे, दुलीचंद कवाडकर, रूपक सराटे, दिगंबर झिनगरे, धमपाल्ली, बनसोड ,रोशनी थेर, जितीन केवट, हसिन मोहुर्ले, हेमलता डोंगरे, दर्शना तुरकर योगेश रामटेके, शारदा भसे, गजानन वाकले, प्रशांत रावते, तिरथ येटरे,रवी हुंगे, कमलबापू बहेकार, बी.एम.कारमकर, संजय बहेकार, केशव भिमटे,जय साखरे, विक्की बोरकर, खुशबू राहुलकर, अमित बोरकर, धनेंद्र बडोले, अंकित नंदागवळी,रामेश्वर श्यामकुवर, धीरज ठाकरे, कृष्णा राहुलकर ,विनायक येडेवार उपस्थित होते.

Web Title: Statement of Indian Students Union to the Minister of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.