महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने दिले समस्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:56 AM2021-03-04T04:56:16+5:302021-03-04T04:56:16+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने पाठपुरावा ...
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने पाठपुरावा करण्यासाठी १ मार्च रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे व उपशिक्षणाधिकारी पारधी यांना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
जी.पी.एफ.च्या पावत्या काही तालुक्यांत मिळाल्या.परंतु त्यात तफावत आहे. ६ व्या वेतन आयोगाच्या ५ हप्त्यांची नोंद नाही. त्यामुळे या हप्त्यांची राशी जमा झाली की नाही याची माहितीच नाही. जी.पी.एफ.हिशेब संगणकीकृत होत असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे, सर्व अडचणी दूर होतील असे सांगण्यात आले. डी.सी.पी.एस.धारक शिक्षकांच्या सी.पी.एफ.कपातीची हिशेब पावती देण्यात यावी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे रिक्त पदे भरण्यात यावे, विज्ञान विषय शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यात यावे, चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी मूल्यमापन समितीची मंजुरीसाठी सेवापुस्तिका शिक्षण विभागामध्ये असून अनेक शिक्षक या वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. ४ टक्के सादिलवार राशी शाळांना देण्यात यावी, २००९ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना कायम आदेश देण्यात यावे, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, वेतन देण्याची सध्याची प्रणाली असली तरी वेतन एक तारखेला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. वेतन उशिरा मिळत असल्याने सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जावर व्याजाचा भूर्दंड शिक्षकांवर बसतो म्हणून हा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. कोविड-१९ च्या कामावर असताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभ देण्यात यावा, मराठी माध्यमाच्या शिक्षकांना हिंदी माध्यमाच्या शाळेवर देण्यात आले होते. त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत देण्यात यावे या मागण्यावर चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष डी.टी.कावळे, जिल्हा सरचिटणीस एस.यू.वंजारी, जिल्हा संपर्क प्रमुख अजय चौरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कृष्णा कापसे, राजू राहांगडाले, अशोक तावाडे, राजेश भरडे, जे.पी.कांरजेकर, ए.बी.मेश्राम, बिसेन उपस्थित होते.