सरपंच संघटनेचे खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:23+5:302021-04-03T04:25:23+5:30
ग्रामसेवक संघटनेने कलम ३१ च्या अनुषंगाने सरपंचाला पदमुक्त करण्याची मागणी करून सरपंचाचा अवमान केला आहे. त्यामुळे मृतक शिवकुमार रहांगडाले ...
ग्रामसेवक संघटनेने कलम ३१ च्या अनुषंगाने सरपंचाला पदमुक्त करण्याची मागणी करून सरपंचाचा अवमान केला आहे. त्यामुळे मृतक शिवकुमार रहांगडाले यांच्या बाबतीत काही तक्रारी होत्या. तसेच त्यांची प्रशासकीय बदलीचे आदेश असताना त्यांना कार्यमुक्त का करण्यात आले नाही? सुसाईट नोटमध्ये सरपंचाच्या पतीवर आरोप केले. जर त्रास होता तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत काही तक्रार केली होती का? विस्तार अधिकारी रहांगडाले यांच्या अनेक तक्रारी आपल्याकडे असताना त्याची चौकशी केली का? त्याचा अहवाल संघटनेला देण्यात यावा, तसेच ग्रामसेवक मुख्यालयी राहतात का? ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवशी ग्रामसेवक संघटना कारवाईसाठी गोरेगावला होते. त्या दिवशी ते रजेवर होते का? त्यांची हजेरी रजिस्टरची प्रत देण्यात यावी, अशी मागणी सरपंच संघटनेने केली असून मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.