पुतळ्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:33 PM2019-03-12T23:33:11+5:302019-03-12T23:34:26+5:30

शहरातील मुख्य चौक व मार्गांवर विविध राजकीय पक्षांचे पोस्टर, होर्डिंग लावण्यात आले होते. यामुळे शहराचे सौंदर्य लुप्त होत चालले होते. तर होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार न करता त्यांच्या पुतळ्यांसमोर होर्डिंग लावून त्यांचा अवमान केला जात होता.

Statues taken by the statues | पुतळ्यांनी घेतला मोकळा श्वास

पुतळ्यांनी घेतला मोकळा श्वास

Next
ठळक मुद्देहोर्डिंग,पोस्टर हटविले : निवडणूक आचारसंहिता

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील मुख्य चौक व मार्गांवर विविध राजकीय पक्षांचे पोस्टर, होर्डिंग लावण्यात आले होते. यामुळे शहराचे सौंदर्य लुप्त होत चालले होते. तर होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार न करता त्यांच्या पुतळ्यांसमोर होर्डिंग लावून त्यांचा अवमान केला जात होता. मात्र नगर परिषदेकडून सुध्दा कुठलीच कारवाई केली जात नव्हती. होर्डिंग व बॅनरच्या युध्दामुळे थोर पुरूषांच्या पुतळ्यांना श्वास घेणे सुध्दा कठिण झाले होते. मात्र १० मार्चला लोकसभा निवडणुकीकरिता आचार संहिता लागू होताच हे सर्व पोस्टर, बॅनर, होर्डिंग हटविण्यात आल्याने पुतळ्यांनी सुध्दा मोकळा श्वास घेतला.
लोकसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू होताच विविध राजकीय पक्षांचे होर्डिंग, पोस्टर, बॅनर तसेच मतदारांना प्रभावित करणारे शासकीय योजनांचे जाहीरातीचे फलक सुध्दा हटविण्यात येते. १० मार्चला सांयकाळी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. तेव्हापासूनच आचार संहिता लागू झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्वरीत शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी लागलेले विविध राजकीय पक्षांचे होर्डिंग, पोस्टर, बॅनर हटविण्याचे निर्देश दिले.
सोमवारी (दि.११) दिवसभर शहरातील होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर हटविण्याचे काम युध्द स्तरावर सुरू करण्यात आले. सर्व होर्डिंग, बॅनर, पोस्टर हटविल्याने शहराला पुन्हा पूर्वीचे सौंदर्य प्राप्त झाले.
शहारात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले होते. तर वाढदिवस व इतर कार्यक्रमाचे होर्डिंग लावताना थोर पुरूषांच्या पुतळ्यांचा सुध्दा विचार केला जात नव्हता. त्यांच्या पुतळ्यासमोर होर्डिंग लावून एक प्रकारे त्यांचा अवमान केला जात होता. मात्र हा सर्व प्रकार नगर परिषदेचे अधिकारी गप्पपणे पाहत होते. शहरातील नागरिकांनी यावर अनेकदा आक्षेप घेतला मात्र त्यांच्यावर कारवाही करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नव्हता. मात्र लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होताच हे सर्व होर्डिंग, बॅनर हटविण्यात आल्याने शहरवासीयांसह शहरातील थोरपुरूषांच्या पुतळ्यांना सुध्दा दिलासा मिळाला असून त्यांनी सुध्दा प्रथमच मोकळा श्वास घेतल्याचे चित्र होते.
साडेतीन हजार होर्डिंग्ज बॅनर हटविले
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तिन्ही मतदार संघातील विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांचे जाहीरातीचे फलक, होर्डिंग्ज हटविण्यात आले. सोमवारी दिवसभर धडक मोहीम राबवून साडेतीन हजारावर होर्डिग्ज,बॅनर हटविण्यात आले.तीन मतदार संघातून १४९२ पोस्टर, १०२५ बॅनर, १०३९ प्रसिध्द पत्रक हटविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Web Title: Statues taken by the statues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.