अहवाल येईपर्यंत संशयितांचा घरीच थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:48+5:302021-05-04T04:12:48+5:30

मुंडीकोटा : आरटीपीसीआर अहवालाला विलंब होतो. तो एका दिवसात मिळत नाही तर रॅपिड ॲन्टिजन तपासणी किटचा तुटवडा आहे. त्यामुळे ...

Stay at home with the suspects until the report is received | अहवाल येईपर्यंत संशयितांचा घरीच थांबा

अहवाल येईपर्यंत संशयितांचा घरीच थांबा

Next

मुंडीकोटा : आरटीपीसीआर अहवालाला विलंब होतो. तो एका दिवसात मिळत नाही तर रॅपिड ॲन्टिजन तपासणी किटचा तुटवडा आहे. त्यामुळे अहवाल येईपर्यंत संशयित कोरोनाबाधितांचा मुक्काम घरीच आहे. अहवाल निगेटिव्ह आला तर बरे, पॉझिटिव्ह आला तर, रुग्णांसह त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहत नाही. हा प्रकार थांबविण्याकरिता योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.

कोविड-१९ च्या पहिल्या लाटेत शहरे हाॅटस्पॉट झाली होती. आता दुसऱ्या लाटेत गावची गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, दरम्यान, कोरोनाची बाधा झाली की नाही, याची तपासणी आरटीपीसीआर आणि रॅपिड ॲन्टिजन चाचणीतून केली जाते. आरटीपीसीआर चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात करून जिल्ह्याच्या ठिकाणी तपासणीकरिता पाठविण्यात येते. रॅपिड ॲन्टिजन तपासणीचा अहवाल त्याच दिवशी मिळतो. आरटीपीसीआर तपासणी नमुना प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळत असल्याने तोच नमुना घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविण्यात येतो आणि त्याच अहवालाची वाट बघावी लागत असते. यामुळे कोविड-१९ ला अंगावर घेण्याचा धोका निर्माण होतो. आरटीपीसीआर तपासणी अहवाल देण्यासाठी २४ ते ४८ तासांचे सुतोवाच आहेत; पण अहवाल मिळण्यास ८ ते १२ दिवस वाट बघावी लागत आहे. शिवाय मोबाइलवर सेवा देण्याची सुविधा असली तरी ती सेवादेखील मिळत नाही. गावागावांत रॅपिड ॲन्टिजन व आरटीपीसीआर नमुने घेतले जातात. रॅपिड ॲन्टिजन तपासणी अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होत असल्याने सकारात्मक रुग्णांवर उपचार करणे सोयीचे ठरते. प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲटिजन किट उपलब्ध झाल्यास जिल्हा आरटीपीसीआर यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकेल; मात्र रॅपिड ॲन्टिजन तपासणी किट उपलब्ध केली जात नसल्यामुळे अनेकांंना आरटीपीसीआर तपासणी अहवालाची वाट बघावी लागते. यामुळेही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Stay at home with the suspects until the report is received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.