शहराच्या विकासात एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:27 AM2018-03-11T00:27:16+5:302018-03-11T00:27:16+5:30

घराची चाकोरी ओलांडून महिला जेव्हा बाहेर येतात तेव्हा काकनभर सरस कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून जातात. स्त्रीसंदर्भात स्त्रियांची वैचारिक, मानसीक बाजू महत्वाची ठरते.

A step forward in the development of the city | शहराच्या विकासात एक पाऊल पुढे

शहराच्या विकासात एक पाऊल पुढे

googlenewsNext
ठळक मुद्देनगराध्यक्षांची धडपड : सत्तेतील महिला कारभारणी

दिलीप चव्हाण ।
ऑनलाईन लोकमत
गोरेगाव : घराची चाकोरी ओलांडून महिला जेव्हा बाहेर येतात तेव्हा काकनभर सरस कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून जातात. स्त्रीसंदर्भात स्त्रियांची वैचारिक, मानसीक बाजू महत्वाची ठरते. केंद्रशासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुरुषांच्या बरोबरीने वाटा दिल्यामुळे आता महिलाही अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत.
गोरेगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदावर विराजमान सिमा राहुल कटरे यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली विकास मुलाखत वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
प्रथम नगराध्यक्षाचा मान सिमा कटरे यांना मिळाल्यावर त्यांनी शहराचा केलेला विकास वाखाणण्याजोगा आहे. समाज व गावाविषयी आसक्ती असली तर शासनाच्या योजना घरोघरी पाणी भरतात, या म्हणीला प्रत्यक्ष कार्यात उतरवून कटरे यांनी आदर्श गावाची संकल्पना मांडली. महिलांसाठी राजकारण एवढे सोेपे नाही.
त्यातही राजकीय पार्श्वभूमी असली तर राजकारणामध्ये यशाची शिखरे काबीज करता येतात. मात्र सिमा राहुल कटरे यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने राजकारणामध्ये नव्या पाऊलवाटा निर्माण केल्या. त्यांच्या राजकारणाला सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक किनार आहे. अल्पावधीतच सिमा कटरे यांनी महिलांना संघटीत करुन त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे.
आरक्षणामुळे महिलांचा राजकीय प्रवेश झाला आणि महिला नगराध्यक्षसाठी स्वत:चे निराळे अस्तित्व निर्माण केले. अर्थात हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. सत्ता आल्यानंतर स्वत:ला सिद्ध करावे लागते. ‘सत्ता चक्रव्यूह’ भेदताना सिमा कटरे यांनी सरकारी योजनांच्या योग्य अंमलबजावणीतून शहराचा विकास करुन आपले नेतृत्व सिद्ध केले. नगर पंचायतचे विविध मुद्दे आणि समस्यांवर मात करीत विकास खेचून आणला. शहरातील विकासात्मक कामांसंदर्भातील निर्णय प्रक्रियेत महिलांची भागीदारी वाढविली व सोबतच महिलांमध्ये विकासाच्या मुद्यांसंदर्भात जागृती केली.
सिमा कटरे यांनी शासनाच्या सर्वच योजनांत आपला सहभाग नोंदविला. मग ती पल्स पोलीओ मोहीम असो महिला मेळावा, बचत गटाची मिटिंग (सभा) असो वा विद्यार्थ्यांचे वार्षिक स्रेहसंमेलन. या साºयाच कामात कटरे आघाडीवर आहे.
विकासाची चौफेर नजर
नगराध्यक्ष सिमा कटरे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात चौफेर विकासाचे सूत्र अंमलात आणले. नगराध्यक्ष पद हे केवळ शहर व जनतेच्या विकासासाठी आहे. या भावनेतून त्यांनी आपल्या कामांचा शुभारंभ केला. २ नोव्हेंबर २०१५ रोजी सिमा कटरे नगराध्यक्षपदावर आरुढ झाल्या. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी पाच कोटींची विकास कामे केली आहे. यात रस्ते बांधकाम, १२६० शौचालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ११ शौचालय दुरुस्ती, पाणीटंकी, बोअरवेल, विद्युत मिटर, १७ इंधन विहिर, दोन फिल्टर (आरओ), पवन तलाव सौंदर्यीकरण, सिमेंट खुर्च्या, दलितोत्तर योजनेंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, महाराष्टÑ नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत रस्ते व नाली बांधकाम, एमजेपी मिनी वॉटर सप्लाय स्किम, ३ टक्के दिव्यांग विकास निधी, ५ टक्के महिला व बालकल्याण विकास निधी, संगणीकृत कर आकारणी इत्यादी कामे झालेली आहे. तर काही कामे सुरु आहेत. विशेष म्हणजे गोरेगाव नगर पंचायतचे १८ नगरसेवक काम व विकासाच्या बाबतीत एक असतात. विकासाच्या मुद्यावर गाव विकासासाठी त्यांची लढण्याची प्रवृत्ती गावविकासासाठी पोषक आहे. हल्लीच्या राजकारणात सत्ताधिश व विरोधक असे दोन गट असतातच. मात्र गोरेगाव नगर पंचायतचे राजकारण असे काही नाही आणि त्यामुळेच गोरेगाव नगर पंचायतच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे नगराध्यक्ष सिमा कटरे यांनी बोलून दाखविले.

Web Title: A step forward in the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.