आकडेबाजांचे वाढले टेंशन

By admin | Published: June 18, 2016 01:06 AM2016-06-18T01:06:36+5:302016-06-18T01:06:36+5:30

आकडा लावून होत असलेल्या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले एरीयल बंच केबल आकडेबाजांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे.

Stocks increased tension | आकडेबाजांचे वाढले टेंशन

आकडेबाजांचे वाढले टेंशन

Next

वीज कर्मचाऱ्यांना मारहाण : माताटोली परिसरातील घटना
गोंदिया : आकडा लावून होत असलेल्या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेले एरीयल बंच केबल आकडेबाजांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. या केबलवर आकडा अडकत नसल्याने आकडेबाजांचा पारा चढला असून यातूनच शहरातील माताटोली परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
वीज चोरीत गोंदिया जिल्हा महावितरणच्या यादीत अग्रस्थानी आहे. वीज चोरीमुळे वीज कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. वी चोरीच्या प्रकारांवर वीज कंपनीकडून कारवाया केल्या जात आहेत. मात्र त्याचे पाहिजे त्या प्रमाणात फलीत येत नाही.
परिणामी वीज कंपनीकडून वीज चोरी होत असलेल्या भागांत आता एरीयल बंच केबल लावले जात आहे. या केबलच्या आत वीज वाहिनी राहत असून वर प्लास्टिक कवर राहत असल्याने त्यावर आकडा लावता येत नाही. परिणामी आकडेबाजी होत नसून वीज चोरी करता येत नाही.
शहरातील माताटोली परिसरातही अशाचप्रकारे एरीयल बंच केबल लावण्यात आले आहे. त्यामुळे येथे आकडे टाकणाऱ्यांचे फोफावत नसून याचाच त्यांच्यात रोष आहे. यातच जावेद शेख (२६) नामक तरूणाने माताटोली केंद्रातील कर्मचाऱ्यांना केबल झिलून देण्यास म्हटले होते. मात्र त्यांनी केबल झिलून देण्यास नकार दिला होता.
याचाच राग डोक्यात धरून जावेद शेख याने रात्रीला माताटोला कार्यालयात जाऊन लाईनमन सुनील रामदास राऊत, सुमेश डी. मेश्राम, राजू बी. गणवीर व कंत्राटादाराचे कर्मचारी उद्गल बिसेन यांना मारहाण केली.
कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांत रोष व्याप्त आहे. (शहर प्रतिनिधी)

वीज कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेध
लाईनमनला मारहाण करण्यात आल्याबाबत सबॉर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनच्यावतीने परिमंडळ कार्यालयासमोर गेट मिटिंग घेऊन घटनेचा निषेध नोंदविला. मारहाण करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. मिटिंगला संघटनेचे पदाधिकारी हरीश डायरे, सुहास धामनकर, सुमित पांडे, सुनील रेवतकर, सुनील मोहुर्ले, दिनेश बोंदरे, एस.आर. खान, अनुप ढोके, एस.बी. दास, विनय नेवारे, प्रदीप मोहीतकर, अक्षय इंगळे, एस.आर. कायंदे, प्रशांत वडसकर, अश्विन शहारे, वनश्री कुंभरे, श्वेता मोरे, जीवनलता वडसकर, पीयूष पटले व अन्य उपस्थित होते.
मारहाणीची पोलिसांत केली तक्रार
लाईनमेनला मारहाण केल्याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता धामनकर, सहायक अभियंता कुमार कोकणे, कनिष्ठ अभियंता प्रदीप मोहीतकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४,५०६,१५१ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Stocks increased tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.