‘चोचो’ने चोरले ३० हजार! हस्तगत केले ५२०० रुपये; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

By नरेश रहिले | Published: March 3, 2024 07:51 PM2024-03-03T19:51:55+5:302024-03-03T19:52:12+5:30

राहुल ऊर्फ चोचो गेंदलाल ओंकारकर (२४, रा. नंगपुरा मुर्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

stole 30 thousand! Rs.5200 seized Action by local crime branch | ‘चोचो’ने चोरले ३० हजार! हस्तगत केले ५२०० रुपये; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

‘चोचो’ने चोरले ३० हजार! हस्तगत केले ५२०० रुपये; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

गोंदिया: शहरातील बाजपेयी चौकातील भाई एच.के.जी.एन ऑटोपार्ट ॲण्ड रिपेअर्स दुकानाच्या जिन्याचे चॅनल गेटचे कुलूप तोडून दुकानातील काऊंटरच्या लॉकरमधून ३० हजार रुपये रोख चोरून नेणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई २ मार्च रोजी करण्यात आली. राहुल ऊर्फ चोचो गेंदलाल ओंकारकर (२४, रा. नंगपुरा मुर्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

बाजपेयी वॉर्डातील मदीना मस्जिद जवळील रहिवासी मोहम्मद शाकीर अब्दुल गनी कुरैशी यांच्या दुकानातील काउंटरचे लॉकर तोडून लॉकरमधील ३० हजार रूपये २६ ते २७ फेब्रुवारीच्या रात्री चोरी करण्यात आले होते. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आाला होता.

या प्रकरणाचा तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुर्री येथील एफसीआय गोडावून परिसरातून राहुल ऊर्फ चोचो ओंकारकर याला अटक केली. चोचोने ही चोरी सूरज ऊर्फ मित्तल मुनेश्वर तुपटे (रा. पैकनटोली) याच्यासोबत केल्याची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबदे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, सहायक फौजदार अर्जुन कावळे, हवालदार भुवनलाल देशमुख, मेहर, चित्तरंजन कोडापे, गायधने, हलमारे, रियाज शेख, शिपाई संतोष केदार, महिला पोलीस शिपाई येरणे यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: stole 30 thousand! Rs.5200 seized Action by local crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.