गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:26+5:302021-08-15T04:30:26+5:30

गोंदिया : नगरपरिषद अध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याप्रसंगी झालेल्या ...

Stop the expansion of Gondia-Kolhapur Maharashtra Express | गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबवा

गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबवा

googlenewsNext

गोंदिया : नगरपरिषद अध्यक्ष अशोक इंगळे यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत गोंदिया शहरात झालेल्या व नियोजित विकासकामांबाबत चर्चा केली, तसेच गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे विस्तारीकरण थांबविण्याची मागणी करीत त्यांना निवेदन दिले.

उल्लेखनीय आहे की, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा विस्तार रीवा (मध्य प्रदेश)पर्यंत करण्याचा प्रस्ताव सेंट्रल रेल्वेद्वारा रेल्वे विभागाला पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावाची माहिती गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना मिळताच, याबाबत तीव्र रोष व्यक्त केला आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा लाभ मिळत असून, ती जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. या गाडीच्या माध्यमातून गोंदिया, भंडारा, बालाघाट आदी जिल्ह्यांतील हजारो प्रवासी प्रवास करतात व गाडीतून दूध, फळ-भाजी, औषधे, कुरियर-डाकसेवा व असंख्य जीवनोपयोगी वस्तू व गरजांची पूर्तता होते. गोंदिया, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी-कन्हान, नागपूर व अन्य शहरांमध्ये काम करणारे स्थानिक नागरिकांकरिता ही ट्रेन एक प्रकारे वरदान आहे. त्यामुळे गाडीची वेळ पूर्वीप्रमाणेच करावी व गाडीतील सर्व डबे गोंदिया-नागपूर व नागपूर-गोंदिया दरम्यान पूर्ववतच सामान्य दर्जाचेच ठेवण्यात यावे, अशी मागणीही इंगळे यांनी निवेदनातून केली आहे. यावर, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना तत्काळ कार्यवाहीकरिता प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे महामहिम राज्यपालांनी इंगळे यांना आश्वस्त केले.

Web Title: Stop the expansion of Gondia-Kolhapur Maharashtra Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.