जबलपूर-चांदाफोर्ट गाडीला मुख्य स्थानकांवर थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:42+5:302021-03-09T04:32:42+5:30

ईसापूर : सोमवारपासून (दि.८) नव्याने सुरू करण्यात आलेल्या जबलपूर-चांदाफोर्ट या गाडीचा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, सौंदड व ...

Stop the Jabalpur-Chandafort train at the main stations | जबलपूर-चांदाफोर्ट गाडीला मुख्य स्थानकांवर थांबा द्या

जबलपूर-चांदाफोर्ट गाडीला मुख्य स्थानकांवर थांबा द्या

Next

ईसापूर : सोमवारपासून (दि.८) नव्याने सुरू करण्यात आलेल्या जबलपूर-चांदाफोर्ट या गाडीचा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, सौंदड व अर्जुनी- मोरगाव रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षेभरापासून गोंदिया-चांदाफोर्ट ही प्रवासी गाडी बंद आहे. त्यामुळे या लोहमार्गावरील प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागला असून, आर्थिक भुर्दंड सुद्धा बसत आहे. त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या जबलपूर-चांदाफोर्ट रेल्वेगाडीला या मार्गावरील अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध व सौंदड या प्रमुख रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा आणि गोंदिया-चांदाफोर्ट ही प्रवासी रेल्वेगाडी त्वरित सुरू करावी, अशी मागणी जायस्वाल यांनी केली आहे. जबलपूर-चांदाफोर्ट या रेल्वे एक्स्प्रेसचा नैनपूरसारख्या लहान स्थानकावर थांबा देण्यात आला. मात्र अर्जुनी-मोरगावसारख्या विविधतेने नटलेल्या तालुक्यात थांबा मिळू नये हे दुर्दैव आहे.

अर्जुनी-मोरगाव हे विधानसभा क्षेत्र असून, निसर्ग सौंदर्याने नटलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ऐतिहासिक प्रतापगड, निर्वासितांचे तिबेटियन स्थळ व विविध पर्यटनस्थळ असल्याने महाराष्ट्रासह विभिन्न राज्यातील भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र एकमेव लोहमार्गावरील प्रवासी व एक्स्प्रेस गाड्यांचा अर्जुनी-मोरगाव तालुक्यात थांबा नसल्याने पर्यटक व भाविकांसह या मार्गावरील प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. रेल्वे विभागाने जबलपूर-चांदाफोर्ट ही गाडी आता आठवड्यातून तान दिवस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा सोमवारपासून (दि.८) शुभारंभ झाला आहे. मात्र गोंदिया ते चांदापोर्ट या २५० कि.मी. अंतरावर या गाडीला कुठेच थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने या मार्गावरील महत्त्वपूर्ण स्थानक समजल्या जाणाऱ्या अर्जुनी-मोरगाव, वडसा, नवेगावबांध व सौंदड या रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी जायस्वाल यांनी केली आहे.

Web Title: Stop the Jabalpur-Chandafort train at the main stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.