पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार बंद करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:46+5:302021-05-08T04:30:46+5:30
तिरोडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात असून, त्यांच्या घरांची जाळपोळ ...
तिरोडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तेथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात असून, त्यांच्या घरांची जाळपोळ केली जात आहे. या घटनेचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तीव्र शब्दात निषेध करते. तसेच सुरू असलेला हिंसाचार त्वरित थांबवून हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. पश्चिम बंगाल येथे सुरू असलेला प्रकार निंदनीय आहे. या हिंसाचारात अनेक लोक मारले गेले आहेत. मात्र तेथील स्थानिक पोलीस हा सर्व प्रकार मूकदर्शक होऊन पाहात असल्याचा आरोप बजरंग दलने केला आहे. त्यामुळे अशा घटनांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तिरोडा शाखेव्दारे मुन्ना लिल्हारे, रमण सिंघल, राज टेंभरे, अनिकेत कटरे, गजानन वाकडोत यांनी केली आहे.