रिवा-इतवारी एक्स्प्रेसला तिरोडा येथे थांबा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:40+5:302021-01-22T04:26:40+5:30
रेल्वे बोर्डाने रिवा ते इतवारी (नागपूर) दरम्यान एक्स्प्रेस गाडी चालविण्यास मंजुरी दिली आहे. पण आश्चर्य म्हणजे रिवानंतर सतना व ...
रेल्वे बोर्डाने रिवा ते इतवारी (नागपूर) दरम्यान एक्स्प्रेस गाडी चालविण्यास मंजुरी दिली आहे. पण आश्चर्य म्हणजे रिवानंतर सतना व मैहर येथे या गाडीचे स्टॉपपेज नाही. गोंदियानंतर महत्त्वाचे स्थानक असलेले तिरोडा, तुमसर रोड, भंडारा रोड आणि कामठी येथेही नाहीत. तुमसर रोड व भंडारा रोड येथे या गाडीला थांबा देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खुशाल नागपुरे यांनी परिसरातील लोकप्रतिनिधी- रेल्वे अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. याअगोदर तुमसर रोडवरील इतर गाड्यांचे थांबे देण्याच्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु तिरोडा परिसरातील लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनावर दबाव न आणल्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिरोडा येथील थांब्याकडे लक्ष दिले नाही. अशात गाडीला तिरोडा येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.