विदर्भ राज्यासाठी तिरोड्यात रास्ता रोको

By Admin | Published: January 12, 2017 12:11 AM2017-01-12T00:11:30+5:302017-01-12T00:11:30+5:30

येथील सुकडी नाक्यावर बुधवारी ११.३० वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the road to the state of Vidarbha | विदर्भ राज्यासाठी तिरोड्यात रास्ता रोको

विदर्भ राज्यासाठी तिरोड्यात रास्ता रोको

googlenewsNext

तिरोडा : येथील सुकडी नाक्यावर बुधवारी ११.३० वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तासपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी समितीचे ५० वर कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशा घोषणा देत तुमसर-तिरोडा-गोंदिया मार्ग अडवून धरला. अर्ध्या तासानंतर हे आंदोलन समाप्त करण्यात आले.
सुकडी नाका येथे सकाळी ११.३० वाजता विदर्भ राज्य आंदोलन समिती तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक अडविली. त्यामुळे गोंदिया व तुमसरकडे जाणारी वाहने अडून पडली. यावेळी जवळपास ५० कार्यकर्ते उपस्थित होते. विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशा घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या. यात विदर्भ राज्य समितीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.टेकचंद कटरे, महिला अध्यक्ष अ‍ॅड.अर्चना नंदरधने, अ‍ॅड.माधुरी रहांगडाले, शामराव झरारीया, सुरेश धुर्वे, सुंदरलाल लिल्हारे, रुबीना कुरेशी, निलकंठ लांजेवार, क्रांतीकुमार साबळे, मुन्ना ठाकरे, नितेश जनबंधू, मनोज तुर्काने, संजय मेश्राम, हुपराज जमईवार, सतीश रहांगडाले, मयूर टेंभरे व अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

 

Web Title: Stop the road to the state of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.