रस्त्यावर बेशमरची झाडे लावून रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:04 PM2018-12-18T23:04:13+5:302018-12-18T23:05:44+5:30
तालुक्यातील इसापूर-खामखुरा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून सुध्दा रस्त्याची दुरूस्ती न केल्याने राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.१८) या मार्गावर दुपारी १२ वाजता बेशमरची झाडे लावून व टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील इसापूर-खामखुरा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून सुध्दा रस्त्याची दुरूस्ती न केल्याने राष्ट्रवादी युवक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.१८) या मार्गावर दुपारी १२ वाजता बेशमरची झाडे लावून व टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोहमारा- वडसा राज्य महामार्ग २७५ व इसापूर-खामखुरा रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र या विभागाने याची दखल घेतली नाही.
त्यामुळे मंगळवारी या मार्गावर बेशमरची झाडे लावून व टायरची जाळपोळ करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविण्यात आला. या मार्गावर अपघात होवून कुणाचा जीव गेल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री व विभागाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
आंदोलनाचे नेतृत्व निखल बरय्या, योगेश नाकाडे, नितीन धोटे, संजय राऊत, केशव उईके, प्रमोद राऊत, राजेंद्र मिसार, शरद मिसार, सन्नी पालीवाल, अशोक ठाकरे, गोपाल शहारे,उध्दव मूंगमोडे, राकेश रोकडे, पुरुषोत्तम मेश्राम, निखिल कसार, देवराम दुनेदार, केदार उईके, मिलींद येलपुरे, मोरेश्वर संग्रामे, अविनाश झाडे, चंद्रशेखर ठाकरे, कमलेश राऊत, क्रिष्णा पारधी,मेघशाम भावे यांनी केले.