वादळाने शाळेचे छप्पर उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:47+5:302021-05-12T04:29:47+5:30
बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे गराडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे छप्पर ...
बिरसी फाटा : तिरोडा तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे गराडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे छप्पर उडाले. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोमवारी (दि. १०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वादळामुळे गराडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे छत उडाले. त्यामुळे शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक रेकॉर्ड, स्मार्ट टीव्ही, झेरॉक्स मशीन इत्यादी सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर इतर साहित्याची किरकोळ नासधूस झाली. तसेच शाळेच्या मागील भागात लावलेली सागाची झाडे सोसाट्याच्या वादळाने शाळेच्या छप्पर पडल्याने नुकसान जास्त झाले. घटना स्थळाची पाहणी पोलीसपाटील प्रकाश मेश्राम, सरपंच गायत्री चौधरी, प्रमोद चौधरी, मुख्याध्यापक जयदेव आमकर, उमाशंकर पारधी मंगळवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. टिनाचे छप्पर उडाल्याने व एका बाजुची भिंत पडल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याची अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शाळेचे छत आणि भिंतीचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्याध्यापकाने केली आहे.