वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादनाला फटका
By admin | Published: April 12, 2015 01:32 AM2015-04-12T01:32:17+5:302015-04-12T01:32:17+5:30
मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.
सालेकसा : मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. झाडावरील कोवळ्या कैऱ्याखाली पडून वाया गेल्या आहेत. त्यामुळे आंबा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचे व अमराई मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
साधारणत: आंब्याचे उत्पादनाचा विचार केला तर कोणत्या वर्षी पीक फार कमी असते तर कोणत्यावर्षी भरघोष उत्पादन मिळते असे सततचे अनुभव शेतकऱ्यांना होत असते. मागील वर्षी आंब्याचे उत्पादन फारच कमी होते. त्यामुळे गावरान आंब्याच्या स्वाद घेणाऱ्यांना सुध्दा बैगनपल्ली आंब्याचे काम चालवावे लागले. यंदा गावरान आंब्याच्या प्रत्येक झाडाला भरपूर बहर आला होता. काही दिवसापूर्वी आमवृक्षांना सुवासिक बहर असताना वादळी वाऱ्यासह पाऊस आला होता. त्यामुळे आमवृक्षांचा बहर मोहर खाली झडून पडला. भावी भरघोष उत्पादनावर फटका बसला. आता मागील दोन दिवसापूर्वी आलेला जोरदार वादळी वारा आणि पाऊस यामुळे झाडाला लागलेले कोवळे आंब्याचे फळ तुडून खाली पडले. छोटे छोटे कोवळे फळ असल्याने ते कोणाच्या उपयोगाचे नसतात. त्यामुळे खाली पडलेले सर्व कोवळे फळ माती पलीत झालेले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे उत्पादन यंदा निम्यावर आल्याचे दिसून येत आहे. आंब्याच्या नुकसानीच्यासुध्दा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावरान आंबा कच्चा असो किंवा पिकलेला असो तो खाण्यासाठीच नाही तर विविध पेय, लोणच, चटणी, पने, आमटी, आमचूर, मुरब्बा असा असंख्य उपयोगात आणला जातो. (प्रतिनिधी)