ग्रामीण भागात पेटताहेत चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:31+5:302021-07-05T04:18:31+5:30

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले ...

Stoves are burning in rural areas | ग्रामीण भागात पेटताहेत चुली

ग्रामीण भागात पेटताहेत चुली

Next

अर्जुनी मोरगाव : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ग्रामीण भागात तर उज्ज्वला गेला चुलीत असे म्हणत चक्क चुली पेटायला सुरुवात झाली आहे. रान उठवणारे भाजप नेते आता गेले तरी कुठे? असा प्रश्न माजी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.

इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. गॅसचे दर महिन्याला ठरतात यात सातत्याने वाढच होत आहे. १ जुलै रोजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वितरण करतेवेळी मोठा गाजावाजा केला होता. वाढीव दर आता या गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात तर आता चक्क चुली पेटत आहेत. चुली पेटवण्यासाठी सरपण लागतं. सरपणासाठी वृक्षतोड आलीच. त्यामुळे आता वनचोरीचे प्रकार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांना चुली फुंकाव्या लागू नये. चुली फुंकल्याने धुरामुळे महिलांमध्ये फुफ्फुसाचे आजार वाढतात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना आणली होती. ही योजना राबविल्यानंतर ग्रामीण भागात कल बदलला होता. परंतु गॅसचा वारंवार भडका उडत असल्याने पुन्हा जुनेच दिवस आल्याच्या भावना विशेषतः महिला वर्गात व्यक्त केल्या जात आहेत. योजना तर आणली. मात्र ती ग्रामीण जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडेल का? हा विचारच केला गेला नाही. सामान्य जनतेला सबसिडीचे प्रलोभन दाखविले. हळूहळू सबसिडीतही कपात केली. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. या वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे गॅसचा भडका उडतो आहे. महागाई गगनाला भिडली आहे. यामुळे सामान्य जनता जाम वैतागली आहे. गॅसपेक्षा आपली चूलच बरी असा समज ग्रामीणमध्ये पसरत आहे. डिजिटल, शायनिंग इंडियाचे स्वप्न पार धुळीस मिळत असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. गॅसचे दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Stoves are burning in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.