कार्यकर्त्यांचे सहकार्य व एकजूट हीच कॉंग्रेसची ताकत

By admin | Published: June 6, 2017 01:02 AM2017-06-06T01:02:14+5:302017-06-06T01:02:14+5:30

कोणत्याही पक्षाची ताकत तिच्या संघटनात असते. कॉंग्रेस कमिटीने सदैव सजगता व एकजुटतेचा परिचय देत संघटनेशी जुळलेल्या...

The strength of the Congress is the co-operation and unity of the workers | कार्यकर्त्यांचे सहकार्य व एकजूट हीच कॉंग्रेसची ताकत

कार्यकर्त्यांचे सहकार्य व एकजूट हीच कॉंग्रेसची ताकत

Next

गोपालदास अग्रवाल : शहर कॉंग्रेस कमिटीची विशेष सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोणत्याही पक्षाची ताकत तिच्या संघटनात असते. कॉंग्रेस कमिटीने सदैव सजगता व एकजुटतेचा परिचय देत संघटनेशी जुळलेल्या प्रत्येक कार्याला यशस्वीरित्या पार पाडले आहे. गावा-गावातील लहानात लहान कार्यकर्त्यांचे सहकार्य व एकजुट हीच कॉंग्रेसची ताकत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथील शहीद भोला भवनमध्ये रविवारी (दि.४) आयोजीत शहर कॉंग्रेस कमिटीच्या विशेष सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, शहरातील उड्डाणपुलावरील बंद दिवे, जागोजागी कचऱ्याचे ढिगार, महापुरूषांच्या पुतळ््यांची विटंबना, सुभाष बागेची दुर्दशा, शासकीय रूग्णालयांचे बेहाल, मोकाट जनावरे, निकृष्ठ बांधकाम आदि समस्यांचे नगर परिषदेने निराकरण करण्याचा सल्ला देत यातूनच सामान्य नागरिक या सुविधांचा लाभ घेऊ शक णार असे सांगीतले.
तसेच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भावाची मागणी करणारे आता आपल्या तोंडावर कुलूप बसले आहेत. उलट सरकारने ५० क्विंटल धानावर बोनसची मर्यादा ठरवून शेतकऱ्यांसोबत दगा केल्याचे त्यांनी सांगीतले. तर आंबेडक चौकात बननारा पादचारी पुल, ५९ कोटींतून तयार होणारी पोलीस कर्मचाऱ्यांची इमारत, पोलीस स्टेशनच्या मागे पार्कींग प्लाझा, रामनगर पोलीस स्टेशन इमारत बांधकाम, पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नुतनीकरण, उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे बांधकाम येत्या दिवसात शहराच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
संचालन करून आभार शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी मानले. सभेला जहीर अहमद, राकेश ठाकूर, सुनिल भालेराव, शकील मंसूरी, अजय गौर, कचरूलाल अग्रवाल, कुर्मराजसिंह चव्हाण, कमल छपारीया, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, सुनिल तिवारी, मोंटू पुरोहीत, देवा रूसे, संदीप रहांगडाले, आलोक मोहंती, चेतना पराते, छाया मेश्राम, सुशिल रहांगडाले, मनोज पटनायक, हरीश तुळस्कर, रोशन रंगारी, कार्तीक तुरकर, कैलाश कापसे, नफीस सिद्धीकी व मोठ्या संख्येत अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Web Title: The strength of the Congress is the co-operation and unity of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.