सार्वजनिक हितासाठी संघटन बळकट करा

By admin | Published: May 27, 2017 12:48 AM2017-05-27T00:48:07+5:302017-05-27T00:48:07+5:30

शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी

Strengthen the organization for public interest | सार्वजनिक हितासाठी संघटन बळकट करा

सार्वजनिक हितासाठी संघटन बळकट करा

Next

ग.दी. कुलथे : जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वयातून करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करीत असताना सार्वजनिक हितासाठी आपले संघटन बळकट करावे, असे आवाहन राजिपत्रत अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक ग.दी. कुलथे यांनी केले.
बुधवार (दि. २४) रोजी जिल्ह्यातील राजिपत्रत अधिकाऱ्यांची सभा जिल्हा कोषागार कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद रक्षमवार, संवाद सचिव माधव झोड, सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलथे पुढे म्हणाले, राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलै दरम्यान लाक्षणकि संप पुकारण्याचा निर्णय अधिकारी व कर्मचारी संघटनेने घेतला आहे. अधिकारी व कर्मचारी काम करीत असताना त्यांना मारहाण व दमदाटी करणाऱ्याला आता दोन ऐवजी पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून एकत्र असले पाहिजे. आपल्या मागण्या सोडविण्यासाठी संघटन हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आपला महासंघ हा राजकारणापासून अलिप्त असल्याचे सांगून कुलथे म्हणाले, केंद्रात व २२ राज्यात सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ही ६० वर्षांची आहे. त्याचप्रमाणे राज्यातसुध्दा सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करावी. त्याचप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे, बालसंगोपन रजा वाढविणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, सातवा आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करणे यासह अनेक आपल्या मागण्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने बांद्रा येथे राजपत्रित अधिकारी महासंघास १,३८१ चौरस मीटर आकाराचा भूखंड १ रूपये नाममात्र दराने उपलब्ध करु न दिला आहे. या बांधकामासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी सढळ हस्ते मदत करावी असे सांगून कुलथे म्हणाले, मुंबई येथे कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही दिवस निवासासाठी ही वास्तू उपयोगात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ. रक्षमवार यांनीही मार्गदर्शन केले. सभेला जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रदिपकुमार बडगे, राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पाथोडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.के.पी. पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे, डॉ.सी. डब्ल्यू वंजारे, डॉ.एन.एस. येरणे, डॉ. अनंत चांदेकर, डॉ.पी.एस. खंडागळे, डॉ.बी.आर. पटले, डॉ.एस.पी. रहांगडाले, डॉ.आर.आर. कोठाडे, डॉ. मनोज राऊत, उपमुख्य लेखाधिकारी व्ही.ए. जवंजाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस. भिमटे, लेखा अधिकारी एस.एस. मसराम, डॉ.के.के. सरजर, रोजगार अधिकारी आर.एन. माटे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ.एस.यु. हुमणे, लेखाधिकारी एल.एच. बावीस्कर, अप्पर कोषागार अधिकारी पी.डी. पारधी, डॉ.एस.बी. पटेल, सहायक गटविकास अधिकारी एस.एस. वाघाये आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे यांनी मानले. या वेळी संघटन बळकट बनविण्यासाठी चर्चा करण्यात आली.

 

Web Title: Strengthen the organization for public interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.