भेदभाव विसरून पक्ष बळकट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:03 AM2018-08-04T00:03:41+5:302018-08-04T00:06:14+5:30
पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले
भारतीय जनता पक्षाच्या सालेकसा तालुका मंडळातील प्रमुख पदाधिकारी, बुथप्रमख, शक्तीकेंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख व प्रमुख महिला, आघाडी पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयाच्या सभागृहात घेण्यात आले. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक समन्वयक म्हणून काशीराम हुकरे व उमेश मेंढे तर पाहुणे म्हणून शंकर मडावी, माजी सभापती देवराज वडगाये, बाबुलाल उपराडे, खेमराज लिल्हारे, माजी जि.प. महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, तालुका महिला आघाडी प्रमुख कल्याणी कटरे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, जया डोये, माजी उपसभापती राजकुमार विश्वकर्मा, मनोज विश्वकर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. पदाधिकाºयांचे प्रशिक्षण वर्ग सत्रानुसार घेऊन वेगवेगळ्या विषयानुरुप पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
आ. पुराम यांनी, आजघडीला भारतीय जनता पक्ष देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशात पक्षाचे बळकटीकरण करुन जनसामान्यांच्या हितासाठी काम करावे. पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन समर्पित भावनेने काम केल्याशिवाय एवढे मोठे यश मिळणे शक्य नव्हते. भाजपाप्रति जनसामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचे सांगीतले.
या वेळी पक्षात सतत कर्मठतेने कार्य करणारे अजय वशिष्ठ, गुणवंत बिसेन, इसराम बहेकार, सुनील अग्रवाल, आर.डी. रहांगडाले, संजू कटरे, रमसुला चुटे, मनोज बोपचे, दिनेश शर्मा, हेमराज सुलाखे तसेच अनेक आजी-माजी सरपंच, पं.स. , जि.प. सदस्य, गाव पातळीवरील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन राजेंद्र बडोले यांनी केले. आभार मनोज बोपचे यांनी मानले.