तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

By नरेश रहिले | Published: November 17, 2024 08:48 PM2024-11-17T20:48:24+5:302024-11-17T20:49:46+5:30

आत्महत्येपूर्वी बहिणीला केला मॅसेज: त्या मॅसेजमध्ये आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे

stressed policeman life ends by shooting himself in gondia | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची स्वत: गोळी घालून केली आत्महत्या

नरेश रहिले, गोंदिया: पोलीसाची ड्युटी करतांना तणावात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या एसएलआर रायफने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. राकेश पांडुरंग भांडारकर (३७) रा. पदमपूर ता. आमगाव जि. गोंदिया असे गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

गोंदिया पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई राकेश पांडुरंग भांडारकर (३७) यांची ड्युटी बिरसी विमानतळ येथे आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून बिरसी विमानतळावर कार्यरत असलेल्या राकेश भांडारकर यांची ड्युटी बिरसी विमानतळावर शांततेत सुरू होती. १७ नोव्हेंबर रोजी पाईंटवर ड्युटी करतांना त्याला त्याचे तेथील अधिकारी व काही सहकारी त्याला मानसिक त्रास देत होते. पाईंटवर ड्युटी असतांना त्याला इकडे-तिकडे पाठवित होते. त्याला वारंवार मानसिक त्रास देत असल्याने तणावात आलेल्या राकेश भांडारकर याने स्वत: जवळील असलेली एसएलआर रायफने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी बहिणीला टाकला मॅसेज

राकेश भांडारकर यांची बहिणी अरूणा भांडारकर ही देखील गोंदिया पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राकेशने दुपारी २:४८ वाजता आपल्या बहिणीच्या मोबाईलवर एक मॅसेज टाकला. रिजर्व लोक असतांना मला पाईंट वरून बोलावत आहेत. माझ्या मरणाला कारणीभूत हे तीन लोक आहेत असा मॅसेज टाकून त्या मॅसेजमध्ये एका पीएसआयसह तिघांचे नाव टाकण्यात आले आहेत.

फोन आल्यावरच कळली मृत्यूची बातमी

आपल्या कामात व्यस्त असलेल्या अरूणा भांडारकर यांनी मोबाईलला हात न लावल्यामुळे त्यांना भावाचा मॅसेज मिळाला नाही. सायंकाळ होताच त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानंतरच राकेशच्या मृत्यूची बातमी कळाली. लगेच त्यांनी बिरसी विमानतळाच्यादिशेने धाव घेतली.

Web Title: stressed policeman life ends by shooting himself in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.