कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:18 AM2021-02-19T04:18:40+5:302021-02-19T04:18:40+5:30

गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवत असून मुख्यमंत्र्यांनी १६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे नियमांची ...

Strictly enforce the rules against the growing background of corona | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा

Next

गोंदिया : विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवत असून मुख्यमंत्र्यांनी १६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले आहे. कार्यप्रणाली मधील दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशांचे कडक पालन करण्याकरिता त्यांनी परिपत्रक निर्गमित केले आहे.

यानुसार, जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद, नगर पंचायत व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, खासगी शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, विद्यालय महाविद्यालय, बॅन्क्वेट हॉल, हाॅटेल्स, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शॉपिंग मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, उद्याने, बाजार,

आठवडी बाजार व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावयाची आहे. येथे प्रमाणित कार्यप्रणाली मधील मर्यादेपेक्षा जास्त संख्येत लोक उपस्थित असतील, उपस्थित लोकांनी मस्क लावलेले नसेल, हॅन्डसॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल किंवा शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसेल तर त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा. तसेच नोटीस देताना पुढील तपासणीत हीच परिस्थिती आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख

नोटिसमध्ये करावा. त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेस जर अशीच परिस्थती राहिली तर संबंधित प्रतिष्ठान संस्था आस्थापना दुकान व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अथवा त्या प्रतिष्ठान, संस्था व आस्थापना दुकानास १५ दिवसाकरिता सील करण्याची कार्यवाही करावी, असे सांगितले आहे. सर्व राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रम घेताना शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीच्या

जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी मिरवणुका, मोर्चे सभा-धरणे इत्यादिंवर पूर्णत: प्रतिबंध घालण्यात येत आले असून असे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी इंडियन मेडिकल असोसिऐशन अध्यक्षांसमवेत सर्व खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक आयोजित करून ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील

व कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर अशांची ताबडतोब कोरोना टेस्ट करुन घेण्यासंबंधीच्या सूचना द्यावयाच्या आहेत. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेले सर्व व्हेंटिलेटर चालू आहेत किंवा कसे याची खात्री करावयाची आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करावयाच्या असून प्रत्येक रुग्णाचे किमान २० संपर्क शोधलेच पाहिजे अशी व्यवस्था करावयाची आहे. ज्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल, त्या ठिकाणी निदान मायक्रो सिलिंग तरी करावे. रुग्णाच्या घरातील सर्वाची कोरोना तपासणी करावी. भाजी, मंडई, दुकानदारांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

तसेच सार्वजनिक स्थळे, सार्वजनिक शौचालये, बस स्थानक व रेल्वे स्थानकांचे निर्जंतुकीकरण करावे, आरोग्य विभागाचे अधिकारी-इंसिडेंट कमांडर यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या कोविड सेंटर मधील उपलब्ध साधन सामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री करावी, पोलीस विभागानी संपूर्ण जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता आदेश व प्रमाणित कार्यप्रणालीचे कडक पालन होत नसल्यास स्वयंप्रेरणेतून मुक्तपणे कारवाई करावी असेही आदेशात नमूद आहे.

----------------------

५० पेक्षा जास्त उपस्थिती नाहीच

लग्न कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांकडून एकूण ५० नागरिकांपेक्षा जास्त लोकांना त्याच प्रमाणे तेरवी कार्यक्रमात एकूण ५० पेक्षा जास्त लोकांना सहभागी होता येणार नाही. अत्येष्टी व अंत्यविधी कार्यक्रमात २० पेक्षा जास्त नागरिकांना सहभागी होता येणार नाही असे आदेशात नमूद आहे.

-----------------------

अन्यथा १० हजार रुपये दंड

हॉटेल-लॉन, मंगल कार्यालय, सभागृह, नाट्यगृहात लग्न समारंभ, वाढदिवस इंगेजमेंट कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, पार्टी किंवा इतर कार्यक्रमांसाठी पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक राहिल. या ठिकाणी प्रमाणित कार्यप्रणाली प्रमाणे ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त नागरिक आढळल्यास व प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे मानक नसल्यावर हॉटेल लॉन, मंगलकार्यालय, सभागृहे, नाटयगृहे यांच्या संचालकावर तसेच कार्यक्रम

आयोजनकांवर प्रत्येकी १०-१० हजार रूपयांचा दंड आकारुन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Strictly enforce the rules against the growing background of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.