महिलांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:05 AM2019-08-02T00:05:17+5:302019-08-02T00:05:36+5:30

आज प्रत्येकच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सारख्या महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. महिलांच्या या जागृती अभियानाला गती देण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या कार्यालयात महिला बचतगटांसाठी बचतगट भवन व महिला सशक्तीकरण भवनाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

Strive for the social, political and economic development of women | महिलांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न

महिलांच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कॉँग्रेस कमिटीचा महिला कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज प्रत्येकच क्षेत्रात महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सारख्या महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत आहेत. महिलांच्या या जागृती अभियानाला गती देण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या कार्यालयात महिला बचतगटांसाठी बचतगट भवन व महिला सशक्तीकरण भवनाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. तसेच प्रत्येक गावात पाच लाख रूपयांच्या निधीतून बचत भवन बांधकामाच्या योजनेवर आम्ही कार्य करीत आहोत. महिलाच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित महिला कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कॉँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे,शहर महिला अध्यक्ष चेतना पराते, मौसमी भालाधरे, माजी महिला अध्यक्ष अ‍ॅड.निलू मांढरे, नगर परिषद सदस्य शिलू ठाकुर, आशा जैन प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतना आमदार अग्रवाल यांनी, कॉँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान दिले आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील व पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी कॉँग्रेस पक्षाच्या प्रयत्नानेच या महत्त्वाच्या पदांवर पोहचल्या आहेत.स्थानिक स्वराज संस्थांमध्येही कॉँग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण देवून राजकारणात समान अधिकार दिला. तर लोकसभा-विधानसभेतही महिलांना आरक्षणाचे वचन कॉँग्रेसने आपल्या वचनपत्रात दिले आहे.
देशातील महिलांच्या बचतगटांची संकल्पना व त्यांना प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी प्रेरित करण्याचे कार्यही कॉँग्रेस सरकारने सन २००४ मध्ये प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात सुरू केले.आज देशातील भाजप सरकार कॉँग्रेसच्याच योजना व धोरणांवर काम करीत आहे. मात्र भाजप सरकारकडे महिलांच्या उत्थानासाठी ना कोणते धोरण नाव नियत असल्याचा आरोप केला. दरम्यान, उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनीही मेळाव्याला संबोधित केले.
प्रास्ताविक मांडून संचालन शहर महिला प्रभारी पदम जैन यांनी केले. मेळाव्याला अनुपमा पटले, पुस्तकला माने, विशाखा वासनिक, योगेश्वरी नेवारे, आरती लिल्हारे, कल्पना चव्हाण, नलिनी बारसकर, सुंदरबाई कनोजिया, मिनाक्षी माने, रोशनी सहारे, प्रकृती शर्मा, शिल्पा जायस्वाल, निशा ठवकर, कुंदा चंद्रिकापुरे, पद्मा उके, मिठ्ठू पोद्दार, छबी जांगडे, रजनी दुपारे, यशोदा लिल्हारे, गीता मेश्राम, ज्योती माने, गीता मोटघरे, शकुंतला बार्बे, रेखा निमकर, बबली दोनोडे, भारती गुप्ता, लक्ष्मी गुप्ता,सुशिला सोनवाने, कमलाबाई गोटे, सुनिता सोनवाने, आशा मिश्रा, चंद्रशिला सोनवाने, कविता मेश्राम, गीता चौरे, हेमलता भेलावे, कविता बानासुरे, नगरसेविका दिपीका रूसे, शुभांगी पाथोडे, उषा परमेश्वर, सावित्री गेडम, मीना मेश्राम, अंजू बावने, राजकुमार मंजुटे, वनमाला गणवीर, प्रमिला दामले, रेखा लालवानी, काजल अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत महिला पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होत्या.

Web Title: Strive for the social, political and economic development of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.