परिचय संमेलनाचा सशक्त आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:54 AM2018-08-25T00:54:35+5:302018-08-25T00:54:58+5:30
येथील श्री राणी सती सेवा समितीच्या वतीने सामाजिक दायीत्वांची पुर्तता केली जात असतानाच जनहीतांच्या कामाताही पुरेपूर सहभाग घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील श्री राणी सती सेवा समितीच्या वतीने सामाजिक दायीत्वांची पुर्तता केली जात असतानाच जनहीतांच्या कामाताही पुरेपूर सहभाग घेतला आहे. आज अविवाहित युवक-युवतींच्या परिचय संमेलनाची गरज असताना समितीच्या आता हे संमेलन घेऊन एक मंच उपलब्ध करवून दिले. या परिचय संमेलनाने अविवाहित युवक-युवतींना एक सशक्त आधार दिला असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
येथील श्री राणी सती सेवा समिती व औरंगाबाद येथील पवित्र बंधन ग्रुपच्यावतीने आयोजित राणी सती मंदिर परिसरात आयोजित अविवाहित युवक-युवती परिचय संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी पवित्र बंधन ग्रुपचे दिलीप अग्रवाल यांनी, आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करता आल्याचे सांगीतले.
तर श्री राणी सती सेवा समितीचे अध्यक्ष कैलाशचंद्र रूंगटा यांनी, संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजीक हिताचे कार्य केले जाणार असल्याचे सांगीतले.
या परिचय संमेलनात ५१ अविवाहित युवक-युवतींनी समाजबांधवांसमोर उपस्थित होऊन आपला परिचय दिला. संचालन करून आभार संस्था सचिव मोहन अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला श्रीकिसन अग्रवाल, बजरंगलाल टेकडीवाल, विष्णूप्रसाद अग्रवाल, संतोष शर्मा, गोपाल आर. अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व समाजबांधव उपस्थित होते.