सामाजिक समता व न्यायासाठी संघर्ष
By admin | Published: April 6, 2016 01:56 AM2016-04-06T01:56:37+5:302016-04-06T01:56:37+5:30
संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद ही एक सामाजिक संघटना असून भटके विमुक्त जमातीच्या विकासासाठी बांधील आहे.
माणिक गेडाम : ‘सीना तान के चलो’ संघर्ष वाहिनीचे आवाहन
गोंदिया : संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद ही एक सामाजिक संघटना असून भटके विमुक्त जमातीच्या विकासासाठी बांधील आहे. त्यामुळे या जमातीतील ४२ जातींना एकत्र येऊन सामाजिक समता व न्यायासाठी संविधानिक मार्गाने संघर्ष करीत आहे. कर्तव्यभान, समाजभान आणि राष्ट्रभान याबद्दल जागरण करुन आता निंधे न राहता ‘सीना तान के कसे चालावे’ याची परेड घेणारी संघटना आहे, असे उद्गार संघर्ष वाहिनीचे गोंदिया जिल्हा संयोजक प्रा. माणिक गेडाम यांनी काढले.
सालेकसा नजीकच्या हलबीटोला येथील अर्ध नागेश्वरालयाच्या शिवगण मंगल भवनात ३ एप्रिल रोजी सालेकसा तालुकास्तरीय सभेला अध्यक्षस्थानावरुन ते मार्गदर्शन करीत होते.
तत्पूर्वी संघर्ष वाहिनी साकोलीचे संयोजक अशोक शेंडे यांनी भटके विमुक्तांच्या न्याय्य मागण्या व त्यासाठी सुरु असलेला लढा याबद्दल माहिती दिली. देवरी तालुका संयोजक तुलाराम कुराडे, देवरीचे कर्मचारी संयोजक सुनील काळे, गोंदिया तालुका संयोजक परेश दुरुगवार, आमगाव तालुका संयोजक श्रावण मडावी यांनी बहुसंख्येने उपस्थित महिला-पुरुषांना यथोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा सहसंयोजक हंसलाल वलथरे व के.टी. कांबळे, सालेकसा तालुका संयोजक विनोद कागदी मेश्राम, कस्तुरा मौजे, मेश्राम, ज्योती वलथरे, मुख्याध्यापक आर.एस. नान्हे, देवरीचे गणराज नान्हे, कटंगीचे जयचंद नवरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद कागदी मेश्राम यांनी मांडले. संचालन शिक्षक कार्यकर्ते एस.एम. मेश्राम यांनी केले. आभार मुख्याध्यापक आय.एस. नान्हे यांनी मानले. दरम्यान संघर्ष वाहिणी सालेकसा तालुक्याची जन्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. (प्रतिनिधी)